Emissions Gap Report 2021: जगाची भीषण तापमान वाढीच्या दिशेने वाटचाल, WMO रिसर्च

Emissions Gap Report 2021: जगाची भीषण तापमान वाढीच्या दिशेने वाटचाल, WMO रिसर्च

Emissions Gap Report 2021: जगाची भीषण तापमान वाढीच्या दिशेने वाटचाल, WMO रिसर्च

गेल्याकाही वर्षांपासून जगाला भीषण तापमान वाढीच्या संकटाचा सामना करावा लागतोय. काही देशांनी तर सुका दुष्काळ जाहीर केला आला आहे. त्यामुळे जगावर तापमान वाढीचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतेय. अशातच संयुक्त राष्ट्राने हवामानविषयक कार्यक्रमातून जग २.७ डिग्री सेल्सियस या भीषण तापमान वाढीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे धोक्याची सूचना दिली आहे. तसेच जलवायूसंदर्भातही उल्लेख केला.

पॅरिस करारानुसार, या दशकाच्या अखेरपर्यंत पूर्व -औद्योगिक क्रांतीच्या तापमानाच्या तुलनेत १.५ ते २ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ नियंत्रणा ठेवण्याचं ध्येय आहे. ते जास्तीत जास्त १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत नियंत्रिण राहिल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मात्र सध्या ज्याप्रकारे तापमान वाढ होतेय त्यामुळे जगभरात आगामी काळात सर्वाधिक तापमान वाढ होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.

यातील पूर्व औद्योगिक क्रांतीच्या स्तरापेक्षा म्हणजे १७५० च्या दशकात कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या वायूंच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली होती. यावेळी कार्बन डाय ऑक्साईड मध्ये तर तब्बल १४९ टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र औद्योगिक क्रांतीनंतरही मानवी कृत्यामुळे प्रदूषणात वाढ होत असून पृथ्वीचा समतोल बिघडल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

नुकताच संयुक्त राष्ट्रा संघाच्या UNEP’s ने Emissions Gap Report 2021: The Heat Is On’ हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, देशांच्या सुधारित राष्ट्रीय हवामान कृती योजनांमधून (नॅशनल डिटरमाइंड कंट्रिब्युशन/NDC) आणि अन्य उपाययोजनांतून २०३० पर्यंत वार्षिक हरितगृह वायू उत्सर्जन पूर्वीच्या ठरावांच्या तुलनेत केवळ ७.५ टक्क्यांनी कमी केले जाईल. या अहवालात एनडीसी, राष्ट्रीय कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपायांचा सोबत २०३० च्या इतर ठरावांचे देखील पुनरावलोकन केले असे सांगितले आहे.

सध्या ग्लोबल वार्मिंग १.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी मर्यादित ठेवण्यासाठी, हरितगृह उत्सर्जनात ५५ टक्क्यांची मर्यादा आणणे आवश्यक आहे. १.५ से. तापमान वाढीची मर्यादा आहे मात्र यावरही तापमान वाढ होत राहिली तर ते पृथ्वी आणि मानवासाठी अधिक घातक ठरु शकते.

संयुक्त राष्ट्राच्या (UNEP) अहवालात असेही नमूद करण्यात आले की, पॅरिस हवामान करारामध्ये निर्धारित केलेल्या उद्दिष्ट सध्या करण्यासाठी सहभागी देशांच्या हवामान विषय नियम, सुधारित ठराव पुरेसे नाहीत. मात्र या शतकात जागतिक तापमानात किमान २.७ अंश सेल्सिअस वाढ होई असा धोका व्यक्त केला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ग्लासगो येथील Cop26 परिषदेला ला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. मात्र जग अजूनही २.७ डिग्री से. इतक्या जागतिक तापमानात विनाशकारी मार्गाच्या दिशेने जात आहे. अशी चिंता व्यक्त केली.

हवामान बदलसंबंधी COP २६ परिषद ही ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान ग्लासगो या ठिकाणी होणार आहे. पॅरिस करारला पाच वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत त्यावर काय कृती करण्यात आली आहे, त्यावर भविष्यात कशा पद्धतीचं धोरण आखायला हवं यावर या बैठकीत ठरवले जाणा आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर हाअहवाल जाहीर झाला आहे.


 

First Published on: October 27, 2021 10:10 AM
Exit mobile version