जम्मू – काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांना घेरण्यात यश

जम्मू – काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांना घेरण्यात यश

जम्मू – काश्मीरमधील बारमुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. राज्य पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन केले जात आहे.  परिसरात नाकाबंदी करत शोधमोहीम राबवली जात आहे. जम्मू- काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक झाली, असे पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, करेरी भागातील वानिगम बाला येथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरु केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रुपांतर झाले. ज्याला सुरक्षा दलाने चांगले प्रत्युत्तर दिले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

याआधी बुधवारीही जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपुरामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यारीपुरा येथील बरिहार्द काठपुरा भागात 27 जुलै रोजी सकाळी सुरक्षा दल गस्तीवर निघाले होते. यादरम्यान त्यांना परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला, यादरम्यान  दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्याला सुरक्षा दलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला असून दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

यापूर्वी 6 जुलै रोजी कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले होते की, त्यांच्या पालकांच्या आवाहनावर 2 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या लोकांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 11 जुलै रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा एक कुख्यात दहशतवादी मारला. या चकमकीबद्दल माहिती देताना एडीजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, सुरक्षा दलांनी दहशतवादी कैसर कोका याला ठार केले आहे, जो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता आणि 2018 पासून राज्यात सक्रिय होता.

राज्यपालांच्या विधानाचा शिंदे गटाकडून निषेध; केंद्र सरकारला लिहिणार पत्र

First Published on: July 30, 2022 10:28 AM
Exit mobile version