जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलाने एका अतिरेक्याला कंठस्नान घातले असल्याचे समजते आहे. काकपोरा भागातील एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलाने तीव्र प्रत्युत्तर दिले यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आले असल्याचे समजते आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार अद्यापही सुरु आहे. पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळासाठी ठप्प करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काकपोरा भागात पोलीस, सुरक्षा दल ५० आरआर आणि सीआरपीएफ दलाच्या संयुक्त पथकाद्वारे सर्व परिसरात शोध मोहिम सुरु आहे.

सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली गेली आहे. परंतु दहशतवाद्यांकडून गोळीबार अद्यापही सुरुच आहे. आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

नौगाममध्ये भाजप नेत्याच्या घरावर हल्ला

श्रीनगरच्या नौगाममध्ये भाजप नेते अन्वर खान यांच्या घरावर गुरुवारी १ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा जखमी झाला होता परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसांच्या रायफल घेऊन दहशतवादी फरार झाल आहेत.

First Published on: April 2, 2021 8:21 AM
Exit mobile version