‘या’ क्रिकेटरवर कोसळला दु:खाचा डोंगर; 2 वर्षीय मुलीचे निधन

‘या’ क्रिकेटरवर कोसळला दु:खाचा डोंगर; 2 वर्षीय मुलीचे निधन

क्रिकेटच्या जगतातून दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लिश क्रिकेटर मॅट डन यांच्या दोन वर्षीय मुलीचे निधन झाले आहे. फ्लोरेन्स असे या चिमुरडीचे नाव होते. फ्लॉरेन्स ही एपिलेप्सीने या आजाराने त्रस्त होती. फ्लॉरेन्सच्या निधनानंतर तिचे वडील मॅट डन यांनी इंस्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर करून तिच्या निधनाची माहिती दिली. (England cricket star Matt Dunn two year old daughter dies from severe form of epilepsy)

सरेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मॅट डन यांने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फ्लॉरेन्सचा फोटो पोस्ट केला आणि त्याला ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील. आमच्या मुलीला सुंदर पंख मिळाले आणि ती SUDEP हरली आहे. यावेळी शब्द शोधणे जवळजवळ अशक्य आहे. तु आमच्यावर अतुलनीय प्रेम केले आणि तु अनेकांच्या जीवनावर केलेला प्रभाव पाहण्यासारखा आहे’, असे कॅप्शन दिले.

दरम्यान, मॅट डन अद्याप इंग्लंडमध्ये पदार्पण करू शकला नाही. परंतु त्याने इंग्लिश अंडर-19 आणि इंग्लंड लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. वेगवान गोलंदाज मॅट डनने 2010मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 43 सामन्यांत 36.21 च्या सरासरीने 117 बळी घेतले आहेत. मॅट डनने गेल्या 11 वर्षांत 18 लिस्ट-ए आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये सरेचे प्रतिनिधित्व केले आहे.


हेही वाचा – पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाडांचा संताप

First Published on: March 18, 2023 6:50 PM
Exit mobile version