कर्मचारी हो, आनंदाची बातमी; आता ७५ टक्के पीएफ काढता येणार!

कर्मचारी हो, आनंदाची बातमी; आता ७५ टक्के पीएफ काढता येणार!

ईपीएफओ

आता सलग ३० दिवस बेरोजगार असल्यास, इपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे कर्मचारी ७५ टक्के रक्कम आपल्या खात्यातून काढू शकतात. ही रक्कम काढल्यानंतरही आपलं खातं या कर्मचाऱ्यांना कायम ठेवता येणार आहे. ईपीएफओच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. गंगवार हे ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे अध्यक्षदेखील आहेत. नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या मीटिंगनंतर हा निर्णय घेण्यात आला असून पत्रकारांना ही माहिती देण्यात आली.

काय आहे निर्णय?

ईपीएफओचा कोणताही कर्मचारी आता या नव्या निर्णयानुसार, जर ३० दिवस सलग अर्थात एक महिना बेरोजगार असल्यास, आपल्या पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकणार आहे. ही रक्कम काढल्यानंतरही या सदस्याला आपलं खातं चालू ठेवता येणार असल्याची माहिती संतोष गंगावार यांनी दिली आहे. तर ईपीएफओ कर्मचारी हा ईपीएफओ योजना १९५२ च्या तरतुदीनुसार, २ महिना बेरोजगार राहिल्यास, उर्वरित शिल्लक राहिलेली २५ टक्के रक्कमदेखील काढून आपलं खातं कर्मचाऱ्याला खातं बंद करता येऊ शकतं. या वर्षाच्या शेवटी मे च्या शेवटपर्यंत ईपीएफओच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक ४७ हजार ४३१.२४ कोटी रुपयांपर्यंत पोचली असून हा आकडा लवकरच १ लाख कोटींच्या पुढे जाईल. तसंच या गुंतवणुकीवर १६.०७ टक्के इतका परतावा मिळत असल्याची माहितीही यावेळी संतोष गंगवार यांनी दिली आहे. तर ईपीएफओनं निधी व्यवस्थापकाच्या परफॉर्मन्सचं मूल्यांकन करण्यासाठी त्याच्या सल्लागार सीआरआयएसआयएलचा कार्यकाळ ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत वाढवला आहे.

First Published on: June 27, 2018 4:08 PM
Exit mobile version