तुर्कीत एर्दोगन यांचा सलग अकराव्यांदा होणार राज्याभिषेक; राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली

तुर्कीत एर्दोगन यांचा सलग अकराव्यांदा होणार राज्याभिषेक; राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली

नवी दिल्ली : तुर्कीत राष्ट्रध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचा सलग 11 व्यांदा राज्यभिषेक होणार आहे. एर्दोगन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत 52 टक्क्यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल देशातील नागरिकांचे आभार मानताना हा तुर्कस्तानचा विजय असल्याचे म्हटले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजनी 99 टक्के पूर्ण झाल्यानंतर नवीन राष्ट्रपतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे त्यामुळे गेली 20 वर्षे देशाचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारे रेसेप तय्यिप एर्दोगन पुन्हा एकदा पुढील पाच वर्षे देशाचे राष्ट्रध्यक्षपद सांभाळणार आहेत. 14 मे रोजी झालेल्या निवडणुकीत एर्दोगान यांना 49.24 टक्के, केमाल यांना 45.07 आणि सिनेन ओगान यांना 5.28 टक्के मते मिळाली होती. कोणत्याही उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते न मिळाल्याने रनऑफ फेरी आवश्यक होती. (Recep Tayyip Erdogan wins presidential election in Turkey, will be crowned for the eleventh time)

एर्दोगान यांनी विजयानंतर कट्टर विरोधक म्हणून समोर आलेल्या केमाल किलिकदारोग्लू यांना उपहासात्मकपणे बाय-बाय-बाय..केमल असे म्हटले आहे. एर्दोगन म्हणाले की, हा विजय देशातील सर्व 8.5 कोटी नागरिकांचा आहे. अधिकृतपणे निकाल जाहीर होण्यापूर्वीच इस्तंबूलमधील एर्दोगान समर्थकांनी जल्लोष सुरू केला. समर्थकांनी ज्ललोष करताना तुर्कस्तान आणि सत्ताधारी पक्षाचा झेंडा फडकवताना गाडीचे हॉर्न वाजवले.

कट्टरपंथी मतदारांचा पाठिंबा
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत एर्दोगान यांना कट्टरपंथी मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. हे कट्टरपंथी समर्थक देशातील इस्लामिक धोरणांना चालना देण्याच्या आणि जागतिक राजकारणात तुर्कीचा प्रभाव वाढवण्याच्या बाजूने काम करतात. गंमत म्हणजे, आधुनिक तुर्कीची स्थापना अता तुर्क केमाल पाशा यांनी धर्मनिरपेक्ष तत्त्वांवर केली होती. दरम्यान, केमाल कलचदारलू यांनी राजधानी अंकारा येथील त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात बोलताना सांगितले की, तुर्कस्तानमध्ये “खरी लोकशाही” स्थापन होईपर्यंत ते लढत राहतील. आमच्या इतिहासातील हा सर्वात अन्यायकारक निवडणुकीचा हंगाम होता. आम्ही भीतीच्या वातावरणाला बळी पडलो नाही. या निवडणुकीत सर्व दबाव असतानाही लोकांची निरंकुश सरकार बदलण्याची इच्छा स्पष्ट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

परदेशी नागरिकांनीही केले मतदान 
संपूर्ण युरोपमध्ये सध्या 3.4 दशलक्ष तुर्की रहिवाशांनी स्वतःची मतदार म्हणून नोंदणी केली होती. यापैकी सर्वाधिक म्हणजे 1.5 दशलक्ष जर्मनीतील आहेत आणि त्यानंतर फ्रान्सचा क्रमांक लागतो. मीडिया रिपोर्टनुसार, या निवडणुकीच्या संदर्भात तुर्की डायस्पोरामध्ये विभाजन पाहायला मिळाले. यातील मोठ्या संख्येने लोकांनी अध्यक्ष एर्दोगन यांच्या बाजूने मतदान केले, तर लक्षणीय संख्येने मतदारांनी त्यांचे विरोधक केमाल कलचदारलू यांना मतदान केले.

First Published on: May 29, 2023 2:45 PM
Exit mobile version