अखेर सत्य येणार समोर; सोनाली फोगाटच्या मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे

अखेर सत्य येणार समोर; सोनाली फोगाटच्या मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बीजेपी नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे सोपावणार असल्याचे सांगितले आहे. सोनाली फोगाटचा गोव्यामधील एका हॉटेलमध्ये पार्टीनंतर मृत्यू झाला होता. सोनालीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास सीबीआईकडे द्यावा अशी मागणी केली होती. हरियाणा सरकारकडून सुद्धा सोनालीच्या कुटुंबीयांच्या मागणीचे समर्थन केले आहे.

सोनालीच्या कुटुंबीयांकडून गोवा पोलिसांच्या तपासावर नाराजी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की सोनाली फोगाटच्या मृत्यूची गोवा पोलिसांकडून योग्य तपासणी होत आहे. पोलिसांना अनेक महत्वाचे पुरावे सुद्धा मिळाले आहेत. परंतु सोनालीच्या कुटुंबीयांकडून CBI कडून तपास करण्याची मागणी केली जात आहे. सोनालच्या पुतण्याने नुकताच आरोप केला होता की, गोवा पोलिसांवर राजकारन्यांकडून दबाव दिला जात आहे. त्यामुळे आम्ही CBI कडून तपास करण्याची मागणी करत आहोत.

कसा झाला सोनालीचा मृत्यू?
मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी सोनाली फोगाट गोव्यामध्ये आली होती. ती ग्राँड लियोनी या हॉटेलमध्ये थांबली होती. 22-23 ऑगस्ट रोजी कर्लीज क्लबमध्ये पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये सोनाली सुद्धा गेली. त्यावेळी तिला या पार्टीमध्ये तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग्स घालून देण्यात आले. त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

सोनाली फोगाटचा टिकटॉक स्टार ते राजकारण प्रवास
सोनाली फोगट या टिकटॉक स्टार होत्या. तसंच, त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. टीकटॉकवरील त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्या नेहमी चर्चेत असायच्या. तसेच, बिग बॉस शोच्या १४ व्या पर्वातही त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, त्यांनी हरियाणातूनही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपाने त्यांची नियुक्ती केली.


हेही वाचा :

रणवीर सिंह, अल्लू अर्जुनचा चाहता; SIIMA 2022 मध्ये रणवीरने केला श्रीवल्ली गाण्यावर डान्स

First Published on: September 12, 2022 3:18 PM
Exit mobile version