‘आम्ही चीनला धूळ चारू’, माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार

‘आम्ही चीनला धूळ चारू’, माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार

पूर्व लडाखमधील भारत-चीन सैन्यातील हिंसक संघर्षानंतर देशात चीनविरोधी संतापाचं लाट उसळली आहे. शत्रूचा सामना करण्यासाठी सीमेवर जाण्यास तयार असल्याचं इंदूरमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त माजी सैनिकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून म्हटलं आहे. माजी सैनिक आणि इंदूरच्या व्हेटेरन्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह सुमारे ५० माजी सैनिकांनी शुक्रवारी खासदार शंकर लालवानी यांच्याकडे राष्ट्रपतींना लिहिलेलं हे पत्र सुपुर्द केलं आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस.एल. शर्मा म्हणाले की, राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात सैन्यातून निवृत्त झालेल्या लोकांची नावे व ज्या युनिटमधून ते निवृत्त झाले आहेत, त्यांची नावे देण्यात आली आहेत. सध्या देश चीनच्या संकटाला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत सर्व माजी सैनिक आपल्या कामावर परतण्यास तयार आहेत आणि यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून कोणतंही वेतन नको आहे. विशेष म्हणजे माजी सैनिक आणि इंदूरच्या व्हेटेरन्स असोसिएशनमध्ये सुमारे २०० माजी सैनिक आहेत.


हेही वाचा – सरकारचा जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय


 

First Published on: July 3, 2020 8:39 PM
Exit mobile version