घरअर्थजगतसरकारचा जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय

सरकारचा जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय

Subscribe

सरकारने उशीरा जीएसटी परतावा भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता अशा करदात्यांना उविसंब शुल्काचा बोजा सहन करावा लागणार नाही. सरकारने जुलै २०२० पर्यंत मासिक व तिमाही विक्री परतावा आणि जीएसटीआर-३ बी (GSTR-3B) कर भरण्यावर विलंब शुल्क केवळ ५०० रुपये निश्चित करण्यात आलं आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) निवेदनात म्हटलं आहे की, “जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा देत सरकारने जुलै २०१७ ते जुलै २०२० पर्यंत जीएसटीआर-३बी कर भरण्यावरील विलंब शुल्क केवळ ५०० रुपये निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये अट घालण्यात आली आहे. अट अशी आहे की, जीएसटीआर-३ बी परतावा ३० सप्टेंबर २०२० पूर्वी दाखल करावा.

- Advertisement -

केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने नमूद केलं आहे की जर कर दायित्व नसेल तर विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. जिथे कर दायित्व असेल तेथे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत जीएसटीआर-३ बी रिटर्न भरल्यावर जास्तीत जास्त विलंब शुल्क प्रति परतावा ५०० रुपये आकारले जाईल. सर्व प्रकारच्या व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे.


हेही वाचा – Amazon नोकर भरती जाहिरातीत मराठी भाषेचा समावेश नाही; मनसे आक्रमक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -