UP Assembly Election 2022 : आरपीएन सिंह यांचा काँग्रेसमधून तडकाफडकी राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

UP Assembly Election 2022 : आरपीएन सिंह यांचा काँग्रेसमधून तडकाफडकी राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसमधून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास सिंह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरपीएन सिंह यांना भाजप स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात उभे करण्याची शक्यता आहे. कुशीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

आरपीएन सिंह यांनी ट्विट करत त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. संपूर्ण देश प्रजासत्ताक दिवसाच्या तयारीला लागला आहे. दुसरीकडे मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. जय हिंद. असं आरपीएन सिंह यांनी म्हटलं आहे.

स्वामी प्रसाद मौर्य विरूद्ध आरपीएन सिंह?

मागील काही दिवसांपासून आरपीएन सिंह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलंय. स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात भाजप आरपीएन सिंह यांना कुशीनगरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आरपीएन सिंह हे मागासवर्गीय संतवार-कुर्मी या समाजातून येतात. कुशीनगर, गोरखपूर, देवरिया यांसारख्या मतदार संघात आरपीएन सिंह यांना मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, युपी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकूण ३० नेत्यांना स्टार कॅम्पेनर्स बनवण्यात आलं होतं. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, गुलाब नबी आझाद, राज बब्बर, सचिन पायलट आणि कन्हैया कुमार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.


हेही वाचा : Goa assembly election 2022 : भाजप गरजेपुरता कार्यकर्ते आणि नेत्यांचा वापर करतंय, उदय सामंतांची टीका


 

First Published on: January 25, 2022 1:29 PM
Exit mobile version