अमित शाहांच्या दौऱ्याला काही तास शिल्लक असताना सापडली स्फोटके, कट काय होता?

अमित शाहांच्या दौऱ्याला काही तास शिल्लक असताना सापडली स्फोटके, कट काय होता?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा शुक्रवारी पश्चिम बंगालमधील बीरभूम मध्ये येत आहेत. बंगाली नववर्ष सुरू होत असताना त्यांचं बंगालमध्ये आगमन होतंय. अमित शाह यांच्या बीरभूम दौऱ्याची सर्व तयारी सुरू असतानाच त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. शाह यांचे बीरभूम येथे आगमन होण्याच्या काही तासांपूर्वी एका कारमधून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली होती. या स्फोटकांनी भरलेली कार बीरभूमच्या मुरारी पोलिसांनी जप्त केली आहे.

या कारमधून जिलेटिनच्या काड्यांचे १७ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये २०० कांड्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजचा पश्चिम बंगाल दौरा पाहता ही स्फोटकांची जप्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गुस्लारा बायपासच्या पुढे एका वीटभट्टीजवळ रस्त्याच्या कडेला ही कार स्कॉर्पिओ कार उभी होती. संशयास्पद वाहन आढळून आल्याने तिथल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता कारमध्ये स्फोटके पाहून धक्काच बसला. स्कॉर्पिओसमध्ये ठेवलेले १७ बॉक्स सापडले असून त्यात ३४०० जिलेटिनच्या काड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : ‘गंगा भागिरथी’ वादात आता भाजपच्या चित्रा वाघ यांची उडी, सांगितला ‘हा’ शब्द

पश्चिम बंगालमध्ये राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्री शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहेत. त्यापूर्वीच बुधवारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केल्याने आता अमित शाहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही स्फोटके कुठे आणि कशी वापरली जाणार होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याशिवाय हे स्फोटक कुठून आले आणि कोणी आणले याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात नेते-पदाधिकाऱ्यांची होणार झाडाझडती ?

तत्काळ या प्रकरणाची माहिती जिल्हा मुख्यालय व राज्य मुख्यालयाला देण्यात आली. यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने सर्व स्फोटके निकामी केली. यानंतर पोलिसांनी कार आणि ही स्फोटके जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार कोणाची आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा: आजच्या भीम जयंतीदिनी मोबाइलवरून पाहता येणार डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा तारा

सध्या पोलीस वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्याच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पश्चिम बंगाल एसटीएफने बीरभूमच्या महमद बाजारमध्ये छापा टाकला होता. यादरम्यान पोलिसांनी ८१ हजारांहून अधिक डिटोनेटर्स जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिघांना अटकही केली.

First Published on: April 14, 2023 1:29 PM
Exit mobile version