चीनच्या सैन्याचा लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी भारतीय सैन्यांवर हल्ला!

चीनच्या सैन्याचा लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी भारतीय सैन्यांवर हल्ला!

चीन- भारत सीमेवर तणाव

मागच्या ४५ वर्षात पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या संघर्षात  भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मोठा तणाव आहे. हा तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना सोमवारी रात्री अचानक गलवाण खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अभूतपूर्व संघर्ष उदभवला.

तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत बफर झोन निर्माण करण्याचं ठरवलं होतं. नियंत्रण रेषा तसेच गलवाण आणि श्लोक नदीच्या जंक्शनचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय झाला होता. संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैनिक नदीच्या पश्चिमेला तर चिनी सैनिक पूर्वेला नियंत्रण रेषेजवळ जाणार होते.

नेमकं काय घडलं?

बफर झोनमध्येच गलवाण नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन वादाला सुरुवात झाली. १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. त्यामुळे  तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उदभवली.

भारताकडून जोरदार प्रत्यूत्तर

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या सैनिकांनी लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी भारतीय सैन्यांवर हल्ला केला. भारतीय जवानांनी सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या संघर्षामध्ये काही सैनिक नदीमध्ये पडले किंवा त्यांना ढकलण्यात आले. काही मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत. हायपोथरमिया म्हणजे शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे काही सैनिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चीनला लागून असणाऱ्या सर्व सीमांवर मोठया प्रमाणात तणाव वाढला आहे.


हे ही वाचा – प्रधानमंत्रीजी कुछ तो बोलो, जनतेला खरं ऐकायचं आहे – राऊत


 

First Published on: June 17, 2020 11:31 AM
Exit mobile version