Ayodhya Ram Mandir : राममंदिर भूमीपूजनाच्या आमंत्रण पत्रिकेवर सिक्युरिटी कोड

Ayodhya Ram Mandir : राममंदिर भूमीपूजनाच्या आमंत्रण पत्रिकेवर सिक्युरिटी कोड

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी उद्या भूमीपुजन सोहळा आयोजिक करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपुजन होणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्व परंपरांच्या संतांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना निमंत्रण पत्रिकादेखील पाठवण्यात आली आहे. ही पत्रिका विशेष असून एका ठराविक पद्धतीचा सिक्युरिटी कोड या निमंत्रण पत्रिकेवर आहे. ही पत्रिका एकदाच वापरली जाऊ शकते. तसेच पत्रिकेला क्रमांकदेखील देण्यात आले आहेत.

अयोध्येतील कारसेवकपुरममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी माहिती देताना सांगितले की, भूमीपुजन सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेश देताना निमंत्रण पत्रावरील नाव आणि नंबर सुरक्षा अधिकारी क्रॉस चेक करतील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर जर तो व्यक्ती परिसराच्या बाहेर गेल्यास त्यानंतर पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. भूमीपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या दोन तास आधी सर्वांनी परिसरात दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहुण्यांच्या गाड्या फक्त रंगमहल बॅरिअरपर्यंत जाऊ शकतात. तिथून पाहुण्यांना पायी चालत कार्यक्रम परिसरात यायचे आहे. अमावा मंदिर परिसरात वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा –

WHO चा इशारा! कोरोनावर रामबाण औषध कदाचित मिळणारच नाही

First Published on: August 4, 2020 1:11 PM
Exit mobile version