जप्त केलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ

जप्त केलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ

तुमच्याकडे 2 हजार रुपयांची नोट असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. देशात बनावट नोटांच्या संख्येच मोठी वाढ झाली आहे. 2018 ते 2020 या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2020 दरम्यान जप्त केलेल्या बनावट नोटांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी माहिती दिली. (fake currency notes of 2000 rupees notes seized in the country ncrb data)

“बनावट नोटांचे चलन रोखण्यासाठी हायक्वालिटी नेक इंडियन करन्सी नोट्सच्या तपासणीसाठी एनआयएला नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे. FICN कोर्डिनेशन ग्रुप (FCORD) राज्यांच्या सुरक्षा एजन्सी आणि केंद्र सरकार यांच्यात गुप्त माहिती शेअर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. शिवाय, एनआयएमध्ये टेटर फंडिंग आणि फेक करन्सी सेलची स्थापना करण्यात आली आहे. जी टेटर फंडिंग आणि बनावट नोटांच्या प्रकरणांची चौकशी करते. भारत आणि बांगलादेश यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे”, असे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटले.

बँक सिस्टिममध्ये जप्त करण्यात आलेल्या 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2018-19 ते 2020-21 पर्यंत कमी झाली आहे.

दरम्यान, 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांच्या संख्येत 10.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये 500 रुपयांच्या 101.9 टक्के अधिक बनावट नोटा सापडल्या आहेत. 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 54.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बनावट नोटांमुळे देशाची आर्थिक रचना कमकुवत होते. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेतील रोखीचा प्रवाह वाढल्याने महागाई देखील वाढते.


हेही वाचा – 8 लाखांचे बक्षीस असलेल्या कुख्यात कमांडरचा खात्मा; गेल्या 13 वर्षांपासून नक्षल्यांमध्ये सक्रिय

First Published on: August 1, 2022 11:33 PM
Exit mobile version