Lok Sabha 2024 : राज्यातील अनेक मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड; 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले

Lok Sabha 2024 : राज्यातील अनेक मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड; 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 8 मतदारसंघात मतदानप्रक्रिया सुरू आहे. मात्र मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील काही मतदान केंद्रांमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. विशेष म्हणजे हिंगोलीतील 39 मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासात मतदानासाठी अडथळा आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान झाले आहे. (lok sabha election 2024 39 ballot machines and 16 control units were replaced second phase voting updates in marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली मतदारसंघातील 39 बॅलेट मशीन आणि 16 कंट्रोल युनिट बदलण्यात आले. 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलण्यात आल्या आहेत. एकूण 39 हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाला अडथळा आल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ईव्हीएम बंद होणे हे तर षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप

मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी तापमान कमी असल्याने मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीत सकाळी 9 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदान झाले.

राज्यात कोणत्या मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये बिघाड?

राज्यातील 8 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?


हेही वाचा – LOK SABHA 2024 : मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांची इथेनॉलवरून विरोधकांवर टीका; म्हणाले, हा VBA चा विजय

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 26, 2024 10:49 AM
Exit mobile version