Fake News: ‘मी जिवंत आहे’; कुस्तीपटू निशा दहियाचा व्हिडिओ समोर

Fake News: ‘मी जिवंत आहे’; कुस्तीपटू निशा दहियाचा व्हिडिओ समोर

Fake News: 'मी जिवंत आहे'; कुस्तीपटू निशा दहियाचा व्हिडिओ समोर

राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियाचा अंधाधुंद गोळीबारात मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पण आता निशा दहियाने स्वतः व्हिडिओ करून मी जिवंत असल्याचे म्हटले आहे. तसेच गोळीबार झाल्याची माहिती खोटी असल्याचे तिने सांगितले आहे. हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाली निशा?

‘माझं नाव निशा आहे. मी सिनिअर नॅशनल खेळायला गोंडामध्ये आली आहे. मी सुरक्षित आहे आणि व्हायरल होणार बातमी फेक आहे. मी सुरक्षित आहे.’ भारतीय कुस्ती महासंघाने निशाचा व्हिडिओ केला आहे.

नक्की काय घडले?

काही वेळापूर्वी हरयाणा सोनीपत येथे झालेल्या गोळीबारात राष्ट्रीय स्तरावर खेळणारी कुस्तीपटू निशा दहियाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या गोळीबारात तिच्या भावाचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. तसेच तिची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले गेले होते. हरयाणाच्या सोनीपत येथील हलालपूर येथे सुशील कुमार नावाच्या अकॅडमीमध्ये ही घटना घडली होती. मात्र याबाबतचे वृत्त सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने निशाचा व्हिडिओ व्हायरल केला. ज्यामध्ये निशा आपण जिवंत असल्याचे सांगत आहे. निशा दहियासोबत ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक व्हिडिओत दिसत आहे.

First Published on: November 10, 2021 7:25 PM
Exit mobile version