शेतकरी आंदोलन: चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट; शूटरचा दावा

शेतकरी आंदोलन: चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट; शूटरचा दावा

चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट; शूटरचा दावा

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी शेतकरी आंदोलकांनी एका संशयित व्यक्तीला प्रसार माध्यमांसमोर हजर केलं. २३ ते २६ जानेवारी दरम्यान चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यासाठी सुपारी मिळाली होती, असा दावा या शूटरने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक पोलीस अधिकारी प्रदिप सिंग यांनी ही सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप शूटरने केला आहे. गोळीबार करुन वातावरण बिघडवण्याचा डाव होता, असा खुलासा त्याने केला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यावर ठाम आहेत. हा कायदा स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. आता अडथळा आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंघू सीमेवरुन शेतकऱ्यांनी संशयिताला पकडलं आहे. सिंघू सीमेवरील शेतकर्‍यांनी पकडलेल्या संशयिताने सोनीपतमधील राय पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रदिप सिंग यांचं नाव घेतलं आहे. प्रदिप सिंग यांनी २६ जानेवारीला चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट रचला असल्याचं संशयिताने सांगितलं. अधिकाऱ्याने त्या चार नेत्यांचे चित्रही शेअर केले आहेत.

 

First Published on: January 23, 2021 8:05 AM
Exit mobile version