Farmers Protest: शेतकरी आंदोलन स्थगित, पुढील रणनिती काय? राकेश टिकैतांनी दिली प्रतिक्रिया

Farmers Protest: शेतकरी आंदोलन स्थगित, पुढील रणनिती काय? राकेश टिकैतांनी दिली प्रतिक्रिया

तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केंद्राने इतर मागण्या मान्य करण्यास सकारात्मकता दर्शवल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी घरी परतण्यास तयारी केली आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर दिल्लीच्या सीमेरेषेवरून आंदोलक शेतकऱ्यांनी तंबू काढण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन स्थगित झाले असले तरी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, आम्ही सरकारशी सहमत आहोत. त्यानंतर आम्ही पत्र दिले, थोडं दु:ख आणि थोडं सुख घेऊन हळूहळू शेतकरी गाझीपूर सीमेवरून आणि इतर सीमेवरून घरी जातील.

शहीद जवानांविषयी व्यक्त केले दु:ख

राकेश टिकैत यांनी तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांविषयी दु:ख व्यक्त केले आहेत. आमचे शेतकरीही शहीद झाले आहेत, अनेक प्रश्न आहेत, ते कायम राहतील. जानेवारीमध्ये दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

आंदोलक शेतकरी आत्ता हळूहळू घरी परतत आहेत. तर गाझीपूर सीमेवरूनही शेतकरी निघाले आहेत. यात १२ डिसेंबरला कैराना येथे सभा होणार आहे. यानंतर अमृतसर-चंदीगडची शेवटी तुकडी गाझीपूर सीमेवरून १५ तारखेला जाईल. ते पुढे म्हणाले की, हे आंदोलन १ वर्षे १३ दिवस चालले. एमएसपीबाबत सरकारसोबत एक समिती स्थापन केली जाईल. या आंदोलनदरम्यान शेतकऱ्यांनी सर्व सण एकत्र साजरे केल्याने त्यांच्यात आत्मियता निर्माण झाली आहे.

राकेश टिकैत यांनी आगामी काळात सरकारशी कोणकोणत्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल. याची माहिती दिली . टिकैत म्हणाले की, आगामी काळात अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येणार आहेत. याशिवाय उसाच्या भावाबाबत उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार आहे.


मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार आता लाल आणि सफेद रंगाची ‘झेब्रा क्रॉसिंग’


First Published on: December 10, 2021 3:24 PM
Exit mobile version