घरमुंबईमुंबईच्या रस्त्यांवर दिसणार आता लाल आणि सफेद रंगाची 'झेब्रा क्रॉसिंग'

मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार आता लाल आणि सफेद रंगाची ‘झेब्रा क्रॉसिंग’

Subscribe

रस्ता क्रॉस करताना आपण झेब्रा क्रॉसिंगचा रंग नेहमीच ब्लॉक आणि व्हाईट असल्याचे पाहत आलोय. मात्र हे रस्ता क्रॉसिंग करणे सहज आणि सुलभ व्हावे यासाठी मुंबई शहरात प्रथमच झेब्रा क्रॉसिंगचा रंग हा ब्लॉक अँड व्हाईट न ठेवता रेड आणि व्हाईट करण्यात येणार आहे. MMRDA ने त्यांच्या कार्यालयाजवळील म्हणजे वांद्रेमधील रस्त्यांवर नव्या लाल आणि पांढऱ्या रंगाचे झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आलेत. वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांनाना लांबूनही झेब्रा क्रॉसिंगचे रंग नीट दिसावे यासाठी नाशिक, लखनौ, नागपूरसह अनेक शहरांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे हे रंग मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. इंडियन रोड क्रॉसिंग कलर कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे रंग ठरवले जातत.

मुंबईत पूर्वीच्या डांबरी रस्त्यांची जागा आत्ता सिमेंटचा रस्ता सर्वाधिक आहेत. यात डांबरी रस्त्यांवर पांढरे आणि काळा रंग ठळक दिसतात. मात्र सिमेंटच्या रस्त्यांवर तेच रंग नीट दिसत नाहीत. यात अनेकदा हे रंग रहदारी आणि वाहतूकीमुळे फुसट होत आहेत. IRC च्या नियमानुसार, सर्वाधिक गर्दीची ठिकाणे, वाहन पार्किंगमुळे रहादारी वाढलेली ठिकाणं, किंवा कॉर्पोरेट भागांत वाहनांची संख्या आणि ये-जा जास्त असते. अशा ठिकाणी कलर कोड ३५ म्हणजेच लाल रंगाचा वापर करण्यास परवानगी असते.

- Advertisement -

वांद्रास्थित बीकेसी परिसर मुंबईतील सर्वात मोठा कॉर्पोरेट परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विविध सरकारी, कार्यालये, बँकांची महत्त्वाची कार्यालये, तसेच इतर खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांची संख्य़ा सर्वाधिक आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर नेहमीच वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. अशा वेळी या ठिकाणी संबंधित भागातील रहदारीनुसार झेब्रा क्रॉसिंगला लाल रंग दिला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत लाल रंगाचा वापर झेब्रा क्रॉसिंगवर वाढत आहे, अशी माहिती आयआरसीचे उपसंचालक (तांत्रिक) राहुल पाटील यांनी दिली आहे.

रंग बदलण्यामागे काय कारण असते?

शहरातील प्रत्येक सिग्नलवर पांढऱ्या आणि काळ्या पॅटर्नमध्ये झेब्रा क्रॉसिंग दिसते. मात्त्यार  वर वाहने उभी केली असता पांढरा रंगही काळा पडतो आणि झेब्रा नाहीसे होतात. यामुळे रस्ता क्रॉस करताना पादचाऱ्यांना अनके अडचणी येतात. अशावेळी झेब्रा क्रॉसिंगवरचं वाहने येऊन थांबतात. तर अपघाताचे प्रमाण वाढते. मात्र रंग बदल्याने झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबणार नाहीत.

- Advertisement -

या रस्त्यावरील लाल आणि पांढऱ्या रंगाच्या झेब्रा क्रॉसिंगचे आयुष्य एक वर्षांपर्यंत असते. परंतु रस्त्यांची परिस्थिती पाहत ते एक वर्षे असू शकते. मात्र नवीन रंगांच्या वापरामुळे किती फरक पडेल हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

झेब्रा क्रॉसिंगची उत्पत्ती कशी झाली?

झेब्रा क्रॉसिंगचा वापर सर्वप्रथम ब्रिटनमध्ये सहा दशकांपूर्वी ३१ ऑक्टोबर १९५१ रोजी झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमधील रस्त्यांवरील वाहतूक वाढू लागली. यावेळी रस्त्यांवरून चालणाऱ्या पादचांरांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने अपघात वाढू लागले. यात अनेकांचा मृत्यू झाला. तेव्हा पासून झेब्रा क्रॉसिंगची सुरुवात झाली. यामुळे प्रवाशांना रस्ता ओलंडण्याचा अधिकार मिळाला.

मात्रा यावेळी क्रासिंगला लोखंडी खिळ्याने खूण करण्यात आली होती. मात्र हे खिळे दुरुन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढतचं होते. यावेळी १९४० मध्ये झेब्रा क्रॉसिंगमध्ये विविध मार्किंगचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये पांढरा आणि काळा रंग सर्वात प्रभावी ठरला. कारण हा रंग दूरुनही स्पष्ट दिसत होता ज्यामुळे वाहनांचा वेग कमी करण्यास चालकांना वेळ मिळायचा.

मात्र झेब्रा क्रॉसिंगला हे नाव कसे पडले तर १९४० मध्ये ब्रिटीश खासदार आणि तत्कालीन पंतप्रधान जिम केलेथ यांनी झेब्रा प्राण्य़ाच्या अंगावर ज्याप्रकारे पट्टे असतात त्यावरून हे नाव दिले.


Next CDS News: सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुढील CDS कोण असेल ? मनोज नरवणे यांचं नाव आघाडीवर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -