जिवंत चिमुकलीला पुरण्याचा प्रयत्न; नराधम बापाला अटक

जिवंत चिमुकलीला पुरण्याचा प्रयत्न; नराधम बापाला अटक

आजोबांसह नवजात बाळ

घरात जेव्हा एक नवीन बाळ येणार असतं, तेव्हा सगळेच त्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असतात, पण भारतात काही वेगळं दृश्य पाहायला मिळतं. घरातील बाई जर गर्भवती असेल, तर ‘तिला मुलगाच झाला पाहिजे’ अशा विचारांमुळे स्त्री भ्रूणहत्या किंवा मुलींची बालहत्या, या सारख्या अनेक घटना भारतात घडतात. अशीच काही घटना तेलंगणातील सिकंदराबादमध्ये घडली. एका रिक्षा चालकाच्या उपस्थितीमुळे नवजात मुलीचा जीव वाचला. गुरुवार, ३१ ऑक्टोबरच्या दिवशी सिकंदराबादच्या ज्युबिली बस स्टेशनाच्या मागच्या निर्जन जागेवर रिक्षा चालक कुमारनं, दोन माणसांना खड्डा खोदताना पाहिलं. हे दृश्य संशयास्पद वाटल्यामुळे कुमार दोघांपाशी गेला.

दोघं नेमकं काय करत होते?

दोघातील एक माणूस वृध्द असून, त्याच्या हातात कपड्यात गुंडाळलेले काहीतरी होतं तर दुसरा माणूस एक खड्डा खोदत होता. कुमारला हे दृश्य संशयास्पद वाटल्यामुळे त्यानं पोलिसांना बोलावलं. नंतर कळण्यात आलं की कपड्यामध्ये एक नवजात बाळ गुंडाळलेलं होत आणि ते दोघ बाळाचे वडील आणि आजोबा असल्याचंं देखील कळण्यात आलं.

‘आम्ही दोघांची चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की ते दोघ करीमनगरला राहतात आणि त्यांच्या सुनेनं सिकंदराबादमधील एका रुग्णालयात मृतावस्थेतील बाळाला जन्म दिला. त्या बाळाला पुरण्याकरीता ते आले होते. बाळाला जवळून पाहिलं तर बाळ श्वास घेत होतं आणि हालचाल देखील करत होतं.’ – पोलीस अधिकारी

बाळ जिवंत आहे हे कळताच पोलिसांनी दोघांनाही जागच्या जागी अटक केली. मुलगी नको असल्याने तिला मारायला ते निघाले होते. बाळाला गांधी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

First Published on: November 1, 2019 4:19 PM
Exit mobile version