Father’sDay2021:फादर्स डे ला नक्की पाहा’हे’पाच सिनेमा

Father’sDay2021:फादर्स डे ला नक्की पाहा’हे’पाच सिनेमा

Father's Day 2021: फादर्स डे ला नक्की पाहा 'हे' पाच सिनेमा

जगभरामध्ये आज उत्साहाने फादर डे म्हणजेच पितृ दिन साजरा करण्यात येत आहे. आईचे मुलांशी भावनीक नातं कितीही घट्ट असले तरी वडीलांचा हात नेहमी पाठीशी असतो. दिसायला जरी कणखर,कडक एखाद्या नारळा सारखा वडीलांचा स्वभाव असला तरी आतून अगदी गोड पाण्याचा झऱ्यासारखे त्यांचे मन असते. आज या खास दिनानिमीत्त आपण बॉलिवुड मधिल वडीलांच्या सुरेख नात्यावर भाष्या करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहणार आहोत. हे चित्रपट पाहून प्रत्येकाला आपल्या वडीलांविषयी मनातिल आदरभाव आणखीन द्वीगुणीत होणार आहे.

दंगल

दंगल या सिनेमात एका अशा पित्याची कथा सांगण्यात आली आहे की जे कुस्ती खेळून देशासाठी मेडल जिंकण्याचे त्यांचे ध्येय आहे. आणि त्यांचे हे स्वप्ण पुर्ण करण्यासाठी ते मुलाच्या जन्मासाठी प्रर्यत करत आहे . पण त्यांना घरात दर वेळेस मुलीचा जन्म होत आहे. पण ह्याच मुली आपल्या वडीलांचे स्वप्न मेहनतीने पुर्ण करतात. अभिनेता आमिर खानने या सिनेमात वडीलांची भुमिका उत्तमरित्या निभावली आहे.

दृश्यम

वडीलांच्या अपार प्रेमावर रचलेली हा एक थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात आपल्या कुटूंबाला वाचवण्याकरिता एक वडील प्रत्येक गुन्हयाचे पुरावे लपवतो.तसेच एका ढालिप्रमाणे परिवारासमोर सदैव उभा राहतो. अभिनेता अजय देवगन याने आपल्या अभिनय कलेच्या जोरावर या भुमिकेत जीव ओतला आहे.

102 नॉट आउट

102 वर्षिय वडील आणि त्यांच्या अगदि काही वर्ष लहान मुल या दोघां पिता पुत्राच्या जोडीला समिक्षकांचे तसेच प्रेक्षकांचे खुप प्रेम मिळाले. मुल कितीही मोठे झाले तरी आपल्या पित्यासाठी ते लाहानचं असते. या सिनेमात अमिताब बच्चन आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपुर यांनी काम केले आहे.

बागबां

फुल फॅमिली ड्रामा असणाऱ्या या सिनेमात कश्या प्रकारे खऱ्या नात्यांचा उलगडा होतो. शेवटी दत्तक घेतलेलं मुलं आपल्या आई वडलांचा सांभाळ करते तसेच शेवटी आपले आई वडीलच आपल्याला कठीण काळात साथ देतात अशी कथा मांडण्यात आली आहे.

छिछोरे

छिछोरे हा सिनेमा वडील आणि मुलाच्या केमिस्ट्रीवर आधारीत आहे. एका परीक्षेत नापास झालेल्या मुलाला वडील कश्या प्रकारे हिंमत देतात त्याला आयुष्यात पुढे जाण्यास जोर देतात .स्वतः वरिल विश्वास प्रस्थापित करण्यास मदत करतात अशी कथा दाखवली आहे. या सिनेमाक वडीलांचा रोल सुशांत सिंह राजपूतने निभावला आहे. तसेच त्याने केलेल्या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतूक देखिल करण्यात आले.


हे हि वाचा – मुनमुन दत्ता ऊर्फ बबिताजी सोबत क्लास टीचरने केली ‘ही’ लज्जास्पद गोष्ट

First Published on: June 20, 2021 9:00 AM
Exit mobile version