चित्रपट निर्माता सुनील दर्शनने Google CEO सुंदर पिचाईंविरोधात केला गुन्हा दाखल ; काय आहे कारण ?

चित्रपट निर्माता सुनील दर्शनने Google CEO सुंदर पिचाईंविरोधात केला गुन्हा दाखल ; काय आहे कारण ?

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप लावण्यात आला आहे. बॉलीवूड फिल्म निर्माता सुनील दर्शन याने गुगल त्यांचे सीईओ सुंदर पिचाई आणि पाच गुगल कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ‘इंतकाम’ आणि ‘अंदाज’ यांसारख्या सिनेमांचा निर्माता दर्शनचे म्हणणे आहे की, गुगल आणि त्यांच्या टीमने 2017 मध्ये त्यांच्या दिग्दर्शन केलेल्या ‘एक हसीना थी एक दीवाना था’ च्या कॉपीराइटचे उल्लंघन केले. गुगलवर कथित कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली.

सुनील दर्शनने दावा केला आहे की त्यांनी चित्रपट अपलोड केला नाही किंवा विकला नाही, तरीही चित्रपट अनेक YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे. या संदर्भात गुगलशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित चॅनेलवरून चित्रपट काढून टाकण्यास नकार दिल्याचेही ते सांगतात. चित्रपट निर्मात्याने 1957 च्या कॉपीराइट कायद्याच्या कलम 51, 63 आणि 69 चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगरीय अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.गुगलने याबाबत सांगितलं की, त्यांनी कॉपीराइट मालकांसाठी युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या कंटेंटचे संरक्षण करण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे.

दर्शनने सांगितले की, गाण्यांसह त्याचा संपूर्ण चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला असून त्याचे कमाईही करण्यात आले आहे. ते लोक माझ्या चित्रपटातून पैसे कमवत आहेत, ज्याचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही. गुगलने अनधिकृत व्यक्तीला त्याचा ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. गुगलच्या या हालचालीमुळे त्या लोकांनी करोडो रुपये कमावले आणि करोडो रुपयांचे नुकसान झाले.

अनधिकृत अपलोड झालेल्या गोष्टींची तक्रार करण्यासाठी कॉपीराइट मालकांवर अवलंबून असतं. याशिवाय कॉपीराइट उल्लंघनाची सूचना मिळाल्यानंतर तो कंटेंट या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन हटवला जातो. याशिवाय एकाहून अधिक वेळा किंवा वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचे अकाऊंट बंद करण्यात येते, अशी माहिती भारतात गुगल प्रवक्त्यांनी दिली आहे.


हे ही वाचा – ॲश्ले बार्टी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत; नदाल इतिहास रचण्यापासून दोन पावले दूर


 

First Published on: January 27, 2022 9:15 PM
Exit mobile version