अखेर अरुणाचल प्रदेशच्या त्या पाच बेपत्ता तरुणांची चीनच्या तावडीतून सुटका

अखेर अरुणाचल प्रदेशच्या त्या पाच बेपत्ता तरुणांची चीनच्या तावडीतून सुटका

अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी जिल्ह्यातील एका सीमेजवळच्या गावातून बेपत्ता झालेल्या पाच नागरिकांची आज, शनिवारी सुटका करण्यात आली. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या ताब्यात असलेल्या या पाचही तरुणांना सुखरूप मायदेश परत आणण्यास यश आले आहे. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी या भारतीयांची नावे आहेत. भारतीय सेनेने दिलेल्या माहितीनुसार, औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चीनने या पाचही अपहृत भारतीयांना किबितू भागात भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले. मायदेशात परतलेल्या या भारतीयांना करोना व्हायरस प्रोटोकॉलनुसार, १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना कुटुंबाकडे सोपवले जाईल.

काय आहे घटना

अरूणाचल प्रदेश येथून बेपत्ता झालेले पाच भारतीय तरूण त्यांच्या हद्दीत आढळले असून या पाच तरूणांना चीन आज भारताकडे सोपवण्यात आले. या संदर्भात केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वटिद्वारे माहिती दिली आहे. चीनने या वृत्ताला दुजोरा देत, तसेच, रिजीजू यांनी देखील या अगोदर माहिती दिली होती की, चिनी ‘पीएलए’ (पीपल्स लिबरेशन आर्मी) ने भारतीय सेनेकडून हॉटलाइनवर पाठवण्यात आलेल्या संदेशाला उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता तरूण त्यांच्या भागात आढळले आहेत. आता या तरूणांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भारत-चीन दरम्यान सीमेवर संघर्ष तीव्र असताना ही घटना झाली आहे. या पाच तरूणांबाबत विचारणा केली असता चीनकडू सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली गेली होती. तुम्ही जे सांगता आहात त्यातले मला काही माहिती नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या तरुणांच्या अपहरणाबाबत सांगितले होते.

हेही वाचा –

निवृत्त नौदल अधिकारी मारहाणप्रकरणी भाजपचे शिवसेनेविरोधात आंदोलन

First Published on: September 12, 2020 5:54 PM
Exit mobile version