Nirmala Sitharaman : इपीएफओ संदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

Nirmala Sitharaman : इपीएफओ संदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

तापसी अनुराग प्रकरण: कशाला बोंबलता? २०१३मध्येपण आयकर धाडी पडल्या होत्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये निर्मला सीतारमण यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा पीएफसंदर्भात करण्यात आली. जे कर्मचारी इपीएफओमध्ये रजिस्टर्ड नव्हते किंवा जे १ मार्चआधी बेरोजगार झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना फायदा देणारी ही घोषणा आहे. १ ऑक्टोबरनंतर अशा कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांसाठी या घोषणेचा फायदा होणार आहे.

– ज्या कंपन्यांमध्ये १ हजार पेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्यात कर्मचाऱ्यांचे १२ टक्के आणि १२ टक्के कंपन्यांचे असे २४ टक्के कर्मचारी भत्ता केंद्र सरकार देणार.

– जिथे १ हजारहून जास्त कर्मचारी आहेत, तिथे कर्मचाऱ्यांचा १२ टक्के भत्ता केंद्र सरकार देणार.

– सबसिडीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डशी संबंधित इपीएफओच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.

दरम्यान, यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था आता सावरत असून देशात रेकॉर्डब्रेक जीएसटी परतावा आला असल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या. मूडीजने देखील देशाचा जीडीपी वजा ८.९ पर्यंत सावरल्याचं रँकिंग दिलं आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत तब्बल ६८ कोटी ६ लाख भारतीयांना अन्नधान्य मिळालं आहे. त्यासोबतच देशात शेतकऱ्यांना १२५ लाख किसान क्रेडिट कार्डचं वाटप करण्यात आलं आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचं वाटप करण्यात आलं आहे, असं देखील निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितलं.

First Published on: November 12, 2020 1:51 PM
Exit mobile version