युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; 11 जणांचा मृत्यू, 6 जखमी

युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; 11 जणांचा मृत्यू, 6 जखमी

युगांडा येथे दृष्टिहीन मुलांच्या शाळेत लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सुरक्षारक्षक दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रय्तन केले. (Fire Broke Out In Uganda Blind School 11 Children Dead)

अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे. युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील सलमा स्कुल या दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला अचानकपणे आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. याबाबतत युगांडा पोलिसांनी तशी माहिती दिली आहे.


हेही वाचा – नाशिकचा पारा घसरला; ‘इतके’ झाले आहे तापमान

First Published on: October 25, 2022 4:33 PM
Exit mobile version