गुवाहाटीत अग्नितांडव! लागोपाठ १५ सिलिंडरचा स्फोट, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

गुवाहाटीत अग्नितांडव! लागोपाठ १५ सिलिंडरचा स्फोट, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

गुवाहाटी – लागोपाठ १५ सिलिंडर स्फोट झाल्याने गुवाहाटीतील आमबारी परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

जीएमसी कॉलनीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, त्याआधीच २५ पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली होती. मात्र, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रय्तन सुरू आहेत. या परिसारत ७० कुटुंबे राहत असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

हेही वाचा दक्षिण भारतावर मंदोस वादळाचे संकट; महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस

आगीमागचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही. परंतु, आग शॉर्टसर्किट किंवा किचनमधून लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. या आगीमुळे लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, बाधितांना अन्न आणि निवारा यांसह अन्य वैद्यकीय मदत पुवण्याचे निर्देश दिले आहेत. गुवाहाटी पोलीस आयुक्तांसह अनेक मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.


जोधपूरमध्येही आग

काल जोधपूरमध्येही अशीच घटना घडली होती. जोधपूर येथील भुंगरा गावातील एका घरात लग्न होते. या लग्न घरातून मिरवणूक निघणार होती. स्वयंपाक सुरू असताना सिलिंडरमधून गळती होऊ लागली. गळतीमुळे पाच सिलिंडरचा एका मागोमाग एक स्फोट झाला. अपघातावेळी घरात १०० जण होते. सिलिंडरचा स्फोट होताच ६० जण होरपळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच आणि सात वर्षीय दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

हेही वाचा – धक्कादायक! लग्नघरात लागोपाठ पाच सिलिंडरचा स्फोट, चार जणांचा जागीच मृत्यू

First Published on: December 10, 2022 8:15 AM
Exit mobile version