घरदेश-विदेशधक्कादायक! लग्नघरात लागोपाठ पाच सिलिंडरचा स्फोट, चार जणांचा जागीच मृत्यू

धक्कादायक! लग्नघरात लागोपाठ पाच सिलिंडरचा स्फोट, चार जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

अपघातावेळी महिला हॉलमध्ये बसून बोलत होत्या. त्यामुळे जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएचे अध्यक्ष वैभव गेहलोत, आमदार मनीषा पनवार, शेरगडच्या आमदार मीना कंवर हेसुद्धा रुग्णालयात जखमींची चौकशी करण्याकरता गेल होते.

जोधपूर – लग्नाची लगबग सुरू असलेल्या एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६० जण जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास शेरगडजवळील भुंगरा गावात हा अपघात घडला.

हेही वाचा – जनावरांच्या तस्करीत दीड कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

- Advertisement -

जोधपूर येथील भुंगरा गावातील एका घरात लग्न होते. या लग्न घरातून मिरवणूक निघणार होती. स्वयंपाक सुरू असताना सिलिंडर गळती होऊ लागली. गळतीमुळे पाच सिलिंडरचा एका मागोमाग एक स्फोट झाला. अपघातावेळी घरात १०० जण होते. सिलिंडरचा स्फोट होताच ६० जण होरपळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच आणि सात वर्षीय दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

६० पैकी ४२ जखमींना एमजीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती, जिल्हा अधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दिली. तसंच, जखमींपैकी ८ जण ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हिंमत असेल श्रद्धाचे शिर शोधून दाखवा; आफताबचे दिल्ली पोलिसांना आव्हान

अपघातावेळी महिला हॉलमध्ये बसून बोलत होत्या. त्याजवळच स्वयंपाक घर होते. त्यामुळे जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएचे अध्यक्ष वैभव गेहलोत, आमदार मनीषा पनवार, शेरगडच्या आमदार मीना कंवर हेसुद्धा रुग्णालयात जखमींची चौकशी करण्याकरता गेल होते.


जखमी व्यक्तींची नावे

नवरा मुलगा सुरेंद्र सिंग, त्याचे वडील शक्ती सिंग, आई दाकू कंवर, बहीण रसला कंवर, भाऊ संग सिंग, वहिनी पूनम कंवर, दोन पुतणे एपी आणि रतन, डिंपल (13), कावेरी (19), कांचन कंवर (45), गवरी कंवर (40), रुक्मा कंवर (40), सुरेंद्र सिंग (30), साजन कंवर (56), रावल राम (18), मगरम (19) , जस्सा कंवर (36), सूरज कंवर (50), कनक कंवर (45), प्रकाश (16), सुरेंद्र सिंग (25), धापू कंवर (15), सज्जन कंवर (10), पप्पू कंवर (30), किरण ( महेश पाल (8), रसाल कंवर (29), तेज सिंग (50), दिलीप कुमार (24), सज्जन कंवर (35), सुगन कंवर (35), आंची कंवर (40), पूनम (25), दुर्ग सिंग (25). 26), संगत सिंग (50), उमेद (30), सुआ कंवर (60) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -