दिल्लीत आप नगरसेवकाच्या घराबाहेर गोळीबार

दिल्लीत आप नगरसेवकाच्या घराबाहेर गोळीबार

फोटो सौजन्य - ANI

राजधानी दिल्लीत नेमकं चाललंय काय? दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राहिले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारण ठरलं आहे ते, आप नगरसेवकाच्या घराबाहेर झालेला गोळीबार. दिल्लीतील आपचे नगरसेवक जितेंद्र कुमार यांच्या घराबाहेर काही अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल केला आहे. गोळीबार करताना जवळपास २४ व्यक्ति होत्या अशी माहिती देखील समोर येत आहे. या गोळीबारामध्ये कारसह तीन बाईकचं देखील नुकसान झालं आहे. दरम्यान, तीन ते चार जणांना मी ओळखू शकेन असा दावा नगरसेवक जितेंद्र कुमार यांनी केला आहे.

केव्हा झाला गोळीबार?

१९ नोव्हेंबर रोजी जितेंद्र कुमार यांच्या घरामध्ये कार्यक्रम होता. त्यासाठी काही नातेवाईक देखील हजर होते. त्यावेळी संध्याकाळी ६.३० वाजता फायरिंग सुरू झाली. गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर जितेंद्र कुमार यांनी सर्वांसह एका खोलीत सुरक्षितरित्या कोंडून घेतलं. त्यानंतर कुमार यांनी पोलिसांना फोन केला. २४ ते २५ लोकांनी जवळपास १० राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गोळीबार हा राजकीय उद्देशानं प्रेरित होता असा दावा जितेंद्र कुमार यांनी केला आहे. यावेळी, जितेंद्र कुमार यांच्या घराबाहेरून ४ ते ६ गोळ्यांचे आवरण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जॉईंट पोलिस कमिशनर देवेश चंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहे. दरम्यान, कुमार यांचं शेजारील काही लोकांशी देखील वाद झाला होता. त्यादृष्टीन देखील पोलिस सध्या तपास करत आहेत. जितेंद्र कुमार यांनी मात्र पोलिसांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आपनं देखील हल्ला राजकीय हेतून प्ररित होता असा आरोप केला आहे.

First Published on: November 16, 2018 12:21 PM
Exit mobile version