Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?

Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?

Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 या सब व्हेरिएंटने भारतात एन्ट्री घेतली आहे. देशातील या सबव्हेरिएंटचा पहिला रुग्ण हैदराबादमध्ये आढळला आहे. गुरुवारी कोविड-19 जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोग्राममधून हे उघड झाले. भारतीय SARS-CoV-2 Consortium on Genomics (INSACOG) शी संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितले की, भारतात BA.4 सबव्हेरिएंटचे तपशील 9 मे रोजी GISAID वर नोंदवण्यात आला, याची पुष्टी करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञानेही सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशातील इतर शहरांमध्ये BA.4 ची रँडम केस आढळून आले आहेत.

SARS CoV 2 व्हायरसचा हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील नवीन कोरोना व्हायरस संसर्गाच्या मोठ्या लाटेसाठी जबाबदार आहे आणि संक्रमण आणि लसीकरणाद्वारे प्रदान केलेल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करण्यास सक्षम आहे.

दरम्यान शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या वर्षी जानेवारीमध्ये भारतात आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेमुळे भारतीय लोकसंख्येने चांगला आणि व्यापक रोगप्रतिकारक प्रतिसाद पाहिला, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.

घाबरण्याची गरज नाही, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलशी संबंधित अधिकारी म्हणाले की, येत्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. तसेच गंभीर कोविड-19 मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 जगभरात कोविड-19 च्या वाढत्या केसेससाठी जबाबदार आहेत आणि हा सब व्हेरिएंट 12 हून अधिक देशांमध्ये आढळला आहेत.

CNBC नुसार, कोविडवरील WHO चे टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, किमान 16 देशांमध्ये जवळपास BA.4 ची 700 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, तर 17 देशांमध्ये 300 पेक्षा जास्त BA.5 प्रकरणे आढळून आली आहेत. कोरोना विषाणूचा हा सब व्हेरिएंट निश्चितपणे अत्यंत संसर्गजन्य आहेत परंतु तितका जीवघेणा नसल्याचे स्पष्ट होतेय.


Assam Flood Crisis : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 7 लाखांहून अधिक बाधित; 9 जणांचा मृत्यू

First Published on: May 20, 2022 8:45 AM
Exit mobile version