Coronavirus: अॅमेझॉन जंगलात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

Coronavirus: अॅमेझॉन जंगलात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. अॅमेझॉन जंगलात राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ब्राझीलच्या ३०० जमातींमधील हे पहिले प्रकरण आहे, अशी माहिती तिथल्या स्थानिक आरोग्य मंत्रालयाच्या अधिकारी सेसाई यांनी बुधवारी दिली. कोकामा जमातीतील २० वर्षीय महिलेने अमेझोनास राज्याची राजधानी मानौस अॅमेझॉन नदीच्या जवळजवळ ८८० किमी कोलंबियाच्या सीमेजवळ, सांटो अँटोनियो डो आयई जिल्ह्यात कोरोना विषाणूची तपासणी केली.


हेही वाचा – अमेरिका रशियाकडून व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य खरेदी करणार; ट्रम्प-पुतीन यांची फोनवर चर्चा


दरम्यान, त्याच जिल्ह्यात कोरोना विषाणुची चार प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये एका डॉक्टरलाही कोरोना झाला होता. सेसाई म्हणाल्या की, ती महिला वैद्यकीय कर्मचारी होती आणि तिचा डॉक्टरांशी संपर्क आला होता. डॉक्टरांना विषाणूची लागण झाल्याने १५ आरोग्य कर्मचारी आणि १२ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली. त्याणध्ये ती एकमेव व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आली आहे, असे सेसाई यांनी सांगितलं.

ब्राझीलच्या ८ लाख ५० हजार आदिवासींसाठी हा विषाणू प्राणघातक ठरू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. शतकानुशतके ते युरोपियन लोकांनी आणलेल्या चेचक (देवी रोग) आणि मलेरिया आजारांमुळे नष्ट झाले आहेत.

 

First Published on: April 2, 2020 10:35 AM
Exit mobile version