सैन्यदलात आता महिलांनाही प्रवेश; वाचा कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया

सैन्यदलात आता महिलांनाही प्रवेश; वाचा कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया

भारतीय सैन्य दलात महिलांना संधी

भारतीय सैन्यदलात आता महिला देखील पराक्रम गाजवू शकणार आहेत. भारतात पहिल्यांदाच सैन्यदलाचे दरवाजे महिलांसाठी खुले करण्यात आले आहेत. सैन्यदलात भरती होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. सैन्यदलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्यासंबंधीची कार्यवाही त्यांनी सुरु केली होती. तसेच जानेवारी महिन्यात पहिल्यांदा सेनेच्या पोलीस दलात महिलांना प्रवेश देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता सेनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. मिलिट्री पोलीस या पदासाठी महिलांना प्रवेश दिला जाणार आहे.

सेनेत महिलांचा २० टक्क्यापर्यंत समावेश असेल

सेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवती २५ एप्रिल २०१९ पासून सेनेच्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. दिनांक ८ जून पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी मिलिट्री पोलीस दलात २० टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग असेल, असे सांगितले होते. सध्या १०० पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. सैन्यदलात होणाऱ्या गुन्हे अन्वेषणाचे काम मिलिट्री पोलिसांवर सोपवण्यात येते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण ८०० महिलांची मिलिट्री पोलीस या पदावर नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये प्रत्येक वर्षाला ५२ महिलांची निवड होईल.

पात्रता

परिक्षेची पद्धत

सध्या सैन्यदलात वरिष्ठ पदावर महिला कार्यरत आहेत. सरंक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१५ साली पदभार स्विकारल्यानंतर मिलिट्री पोलिसांत महिलांना घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा उद्देश लष्काराच्या तीनही दलात महिलांचे प्रतिनिधीत्व कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

First Published on: April 25, 2019 12:47 PM
Exit mobile version