फिटनेस बॅण्ड आता रिस्ट वॉचच्या रुपात

फिटनेस बॅण्ड आता रिस्ट वॉचच्या रुपात

smart watch

आपल्या रिस्ट वॉचचं काम आता नुसतं वेळ दाखवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अनेक पावलं पुढे जात आता रिस्ट वॉचमध्येही नवनवीन प्रयोग होत आहेत. जनरेशन नेक्स्टमध्ये आरोग्याला दिवसेंदिवस आलेलं महत्व पाहता फिटनेस बॅण्डमध्ये होणार संशोधन सर्वात अग्रस्थानी आहे. त्याचाच प्रत्यय हा नव्याने दाखल झालेल्या अ‍ॅपल वॉच सिरीज ४ च्या माध्यमातून ग्राहकांना येणार आहे. अ‍ॅपल वॉच सिरीज ४ च्या निमित्ताने सर्वात अ‍ॅडव्हान्स अशा स्वरूपाचा फिटनेस बॅण्ड मार्केटमध्ये दाखल झाला आहे. हार्ट ट्रॅकिंग आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे दोन महत्वाचे फीचर्स अ‍ॅपल वॉच सिरीजच्या निमित्ताने फिटनेस बँडमध्ये पहिल्यांदा दाखल झाले आहेत. तंत्रज्ञान युजर्सची आयुष्य सुखकर करतानाच बहुमोलाचा असा जीव वाचवण्यासाठी महत्वाचं ठरेल अशीच चर्चा आता फिटनेस बँडमधील नवनवीन फीचर्समुळे होऊ लागली आहे.
अ‍ॅपल वॉच खरंच एखाद्या माणसाचा जीव वाचवेल हा सध्या चर्चेतला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून समोर येत आहे. होय, नव्या फीचरमुळे हे शक्य आहे असंच अ‍ॅपलच हे नवीन फीचर आहे. तुमच्या एरव्हीच्या हार्ट बिट्सची हे वॉच नोंद ठेवणारच आहे. पण हार्ट बिट्समध्ये एरव्हीपेक्षा झपाट्याने झालेल्या वाढीचा एलर्ट या नव्या फीचर्समुळे शक्य होईल. जेव्हा हार्ट बिट्स अ‍ॅबनॉर्मल किंवा वाढलेले असतील तेव्हा या वॉचमधील फीचरनुसार तुमचा ईसीजी आपोआप रेकॉर्ड होईल अशी सुविधा या हेल्थ बँडमध्ये आहे.

ईसीजी यामुळेच शक्य
अ‍ॅपल वॉच सिरीज ४ साठी ईसीजी शक्य होणार आहे तो म्हणजे इलेक्ट्रोड्समुळे. गोल्डन डिजिटल क्राऊनच्या रूपात या इलेक्ट्रोडचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल क्राऊनला ३० सेकंदापर्यंत टच करून ईसीजी वेव्हफॉर्म शक्य होईल. तुमचा हार्ट रेकॉर्ड करतानाच हार्ट रिदम रेकॉर्ड करणेही यामुळे सहजशक्य आहे. अनियमित हार्टबिट्स ट्रॅक करणे या सगळ्या ईसीजी डेटामुळे सहजशक्य होणार आहे. सध्याच्या हेल्थ बँडमध्ये असणार्‍या हार्टबिटच्या फीचरच्या एक पाऊल पुढे जात ईसीजीचे महत्वाचे फीचर आहे. अनेकदा हार्ट रेट मॉनिटरींगचे फीचर हे योग्य आकडे उपलब्ध करून देत नसत. हार्ट रेटपेक्षा अनेक पटीने हार्ट रिदम महत्वाचा आहे. म्हणूनच हार्ट रिदम हे ईसीजीच्या स्वरूपात पहायला मिळणं हे युजरसाठी महत्वाचं असं फीचर आहे. हार्टशी संबंधित उपचारासाठी सर्वात महत्वाचा ठरणारा डेटा म्हणजे एट्रीयल फॅब्रिलेशन. स्ट्रोकसाठी हे महत्वाच कारण आहे. एरव्ही आपण डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जातो तेव्हा १२ वायर (लिड)चा समावेश असलेल्या मशीनमधून ईसीजी काढला जातो. अ‍ॅपल वॉच सिरीज हे सिंगल लिड ईसीजीच्या बरोबरीच असं आहे. म्हणूनच हृदयाशी संबंधित असे महत्वाचे संकेत मिळत असतानाच हा ईसीजी महत्वाचा ठरणारा असा आहे.
फीचरच्या मर्यादा अमेरिकेच्या एफडीएने ईसीजी फीचरला मान्यता दिली आहे. आरोग्य क्षेत्रात हा हेल्थ बँडचा डेटा हा केवळ माहितीपुरता मर्यादित आहे. पण हे फीचर अजुनही आरोग्य क्षेत्रातील अनेकांच्या लेखी तितकस विश्वासार्ह नाही. एखादा छोटासा केस किंवा बोटांची थोडीशी अस्थिर अशा स्वरूपाची हालचालही तुमचं ईसीजीच रेकॉर्ड चुकीचं ठरू शकत. २२ वर्षाखालील रूग्णांसाठी हे फीचर वापरासाठी उपयुक्त नाही असं अ‍ॅपलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

First Published on: September 28, 2018 12:02 AM
Exit mobile version