Coronavirus: पाच महिन्यांच्या चिमुकलीने महिनाभर व्हेंटिलेटरवर राहून केली कोरोनावर मात!

Coronavirus: पाच महिन्यांच्या चिमुकलीने महिनाभर व्हेंटिलेटरवर राहून केली कोरोनावर मात!

कोरोना व्हायरस

जगभरातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान ब्राझीलमधील पाच महिन्यांच्या चिमुकलीने महिनाभर व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर कोरोनावर मात केली आहे.

एका वृत्तानुसार, महिनाभर ही चिमुकली कोमात असूनही तिने कोरोनाला हरवलं आहे. चिमुकलीचे आई-वडील म्हणाले की, एका नातेवाईकडे गेलो होतो. त्यानंतर मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाल्याचे समोर आले.

या मुलीच डोम नाव असून तिला रिओ डी जनेरियो लोकार्डी येथील प्रो कॉर्डिको रुग्णालयामध्ये जवळपास १४ दिवसांपासून तिच्या उपचार सुरू होते. त्यानंतर बरी झाल्यानंतर तिला डिस्चार्ज दिला. मुलीचे वडील म्हणाले की, ‘डिस्चार्ज दिल्यानंतर पण मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातील डॉक्टरांना असे वाटले की तिला एक प्रकारचे बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाले आहे. तिच्यावर उपचार करूनही ती बरी झाली नाही आणि तिची अवस्था आणखी बिकट झाली.’

त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले. जिथे मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ती गेल्या महिनाभर व्हेंटिलेटरवर होती.

लॅटिन अमेरिकेतील ब्राझील कोरोनाचे एक केंद्र म्हणून उद्यास आले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ब्राझीलमध्ये ५ लाख ८४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २९ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – कोरोना व्हायरसच्या बचावासाठी ‘हे’ मास्क वापरणं सर्वोत्तम!


 

First Published on: June 2, 2020 10:34 PM
Exit mobile version