चुकीचे मॅसेज करता येणार दुरुस्त; WhatsApp ने आणले नवीन फिचर

चुकीचे मॅसेज करता येणार दुरुस्त; WhatsApp ने आणले नवीन फिचर

नवी दिल्ली : आज प्रत्येकजण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वॉट्सऍपचा सर्रास वापर करताना दिसतो. पण बहुतेक वेळा आपण चुकीचा मॅसेज पाठवतो आणि नंतर तो डिलीट करण्याचा प्रयत्न करतो. पण आता याची गरज नाही. कारण वॉट्सऍपने नवीन फिचर लॉन्च केले आहे. या फिचरचा वापर करून आपण पाठवलेला मॅसेज दुरुस्त करू शकतो.

आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना वॉट्सऍपच्या माध्यमातून मॅसेज करतो. पण बऱ्याचदा घाईगडबडीत आपण समोरच्या व्यक्तीला चुकीचा मॅसेज पाठवतो तो मॅसेज समोरचा व्यक्ती वाचू नये यासाठी तो लवकर डिलीट करण्याच प्रयत्न करतो. पण आता याची गरज नाही कारण वॉट्सऍपने वॉट्सऍप एडीड हे नवीन फिचर आणले आहे. यामुळे आपल्याला आपली चुक सुधारता येणार आहे. (WhatsApp introduced a new feature for Fixed incorrect messaging)

15 मिनिटांत सुधारावी लागेल चूक
वॉट्सऍप एडिट फीचर वापर करून वापरकर्त्यांना चूक सुधारता येणार आहे. पण यासाठी वॉट्सऍपने एक अट घातली आहे. त्यामुळे आपण पाठवलेला मॅसेज चूक झाली असेल आणि ती चूक सुधारायची असेल तर आपल्याला फक्त 15 मिनिटांचा अवधी मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पाठवलेल्या मॅसेजमधील चूक सुधारता येणार नाही. पण आधी दिलेल्या फिचरनुसार वापरकर्त्यांना मॅसेज डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

येत्या काही दिवसात अनेक बदल होणार
वॉट्सऍप एडिट ऑप्शनशिवाय वापरकर्त्यांना अनेक फिचर मिळणार आहेत. व्हॉट्सअप एडिट फिचर येत्या काही दिवसांत वापरकर्त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय वॉट्सऍपच्या मॅसेजमध्ये चुकीचे स्पेलिंग सुधारता येणार आहे. त्यामुळे एखादा नवीन शब्द, पर्यायी शब्द आपल्याला जोडता येणार आहे. याबाबत फिचरवर चाचपणी सुरु आहे.

मॅसेजमधील चूक कशी दुरुस्त करणार
वॉट्सऍपमध्ये पाठवलेला मॅसेजमध्ये एखादी चूक असले तर आपल्याला जो शब्द अथवा वाक्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो शब्द किंवा वाक्यावर लाँग प्रेस करावे लागेल. त्यानंतर आपल्याला एडिटचा पर्याय दिसेल. या एडिट पर्यायावर क्लिक केल्यावर आपण शब्दातील किंवा वाक्यातील चूक दुरुस्त करू शकणार आहोत. हा पर्याय केवळ 15 मिनिटांसाठी उपलब्ध  असणार आहे. त्यामुळे आपल्याला या वेळेतच मॅसेजमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. जर आपण 15 मिनिटांमध्ये दुरुस्ती केली नाही तर आपल्याला आधीप्रमाणे डिलिट या पर्यायाचा वापर करावा लागेल.

एडिट केलेला मॅसेज समोरच्या व्यक्तीला समजणार 
वॉट्सऍप एडिड या नवीन फिचरमुळे मॅसेजमुध्ये सुधारणा करता येणार असली तरी त्यांना एका अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण आपण एडिट केलेल्या मॅसेजवर लेबल केले जाणार आहे. पण आपण कोणता शब्द किंवा वाक्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे, हे समोरच्या व्यक्तीला समजणार नाही. मेटा कंपनीने फेसबुकला 10 वर्षांपूर्वीच एडिट फीचर दिले होते. पण व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर येण्यासाठी वेळ लागला आहे.

First Published on: May 25, 2023 5:40 PM
Exit mobile version