लघवी विकून ती कमवायची लाखो रुपये!

लघवी विकून ती कमवायची लाखो रुपये!

फ्लोरिडामध्ये तरुणी विकायची स्वत:ची लघवी

पैसे कमवणे ही एक कला असते, जी कला प्रत्येकाला येत नाही. लोग लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी काय नाही करत. कोणी एकाद्या व्यवसायात गुंतवणुक करतो तर कोणी त्याच्या नशिबाने लाखो-कोटी रुपये कमावतो. मात्र कधी तुम्ही ऐकले आहे का, की कोणी आपली लघवी विकून लाखो कमावले आहेत. ऐकूण आश्चर्य वाटले असेल ना. पण हे सत्य आहे.

दिवसाला कमवायची १२ हजार

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका तरुणीने आपली लघवी विकूण घर बसल्या लाखो रुपये कमवत होती. जेव्हा लोकांना तिच्या बद्दल माहिती पडले तेव्हा सर्वांना धक्का बसला. असं काय तिच्या लघवीमध्ये आहे की लोकं तिच्या लघवीला विकत घेतात असा विचार करुन लोकं हैराण झाले. पण तिने लाखो रुपये कमावले हे खरं आहे. प्रकरण असे आहे, या कॉलेज तरुणीने दोन वर्षापूर्वी एका जाहिराद्वारे लघवी विकण्यास सुरुवात केली. तिची लघवी विकत घेण्यास लोकांनी गर्दी केली. ही तरुणी दिवसाला १२ हजार रुपये कमवायची. एका दिवसात ऐवढे पैसे कमवण्यामुळे ती जास्तच चर्चत आली आहे.

जाहिरातीद्वारे विकली लघवी

फ्लोरिडामधील या तरुणीने एक विचित्र जाहिरात दिली होती. “आपण 3 महिन्यांची गर्भवती असून, ज्यांना माझी पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी टेस्ट असणारी लघवी आपल्या ‘खास’ कामासाठी पाहिजे त्यांना मी उपलब्ध करून देऊ शकते. दोन थेंबांच्या विशेष लघवीसाठी २५ डॉलर आकारले जातील”. ही जाहिरात वाचून तिच्याकडे लोकांनी गर्दी केली. या तरुणीने त्यातून लाखो रुपये कमावले. पण या युरिन खरेदी मागचे कारण समजल्यावर लोक हैराण झाले.

लघवी वापरून करायच्या ब्लॅकमेल

या तरुणीची लघवी खरेदी करणाऱ्या ज्यास्त मुली आणि महिलांचा समावेश होता. अशाप्रकारे लघवी विकून ती दिवसाला २०० डॉलर म्हणजे १२०० रुपये कमवायची. या तरुणीची लघवी विकत घेऊन इतर महिला आणि तरुणी या लघवीतून प्रेग्नेंसी टेस्ट करायच्या. या प्रेग्नेंसी टेस्टला दाखवून अशा पुरुषांना ब्लॅकमेल करायच्या जे त्यांना लग्नाला नकार देऊ शारीरिक संबंध ठेवायचे आणि नंतर लग्नाला नकार द्यायचे. या माध्यमातून या तरुणी त्यांच्यावर दबाव आणायच्या.

भन्नाट कल्पनेची जोरदार चर्चा

दरम्यान, लघवी विकणारी तरुणीने सांगितले की, खरेदी करणाऱ्या तरुणी आणि महिला माझ्या लघवीचे काय करायचे याच्या बद्दल मला माहिती नाही. पण मी माझी लघवी विकून लाखो रुपये कमवायची त्या पैशाचा वापर मी माझी कॉलेजची फी भरण्यासाठी करायचीय. ही बातमी जेव्हा समोर आली तर लोकं हैराण झाली. त्यानंतर या मुलीची पैसे कमावण्याची भन्नाट कल्पनाची जोरदार चर्चा सुरु आहे.

हेही वाचा – 

स्वतःचेच मूत्र पिऊन ‘ती’ सहा दिवस जिवंत राहिली

First Published on: November 25, 2018 5:11 PM
Exit mobile version