पाकिस्तानात खाद्यसंकट तीव्र, कराची बंदरावर अडकले गव्हाचे कंटेनर

पाकिस्तानात खाद्यसंकट तीव्र, कराची बंदरावर अडकले गव्हाचे कंटेनर

कराची – पाकिस्तानात गव्हासाठी मारामार सुरू असताना पाकिस्तानी बँका परकीय चलन देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कराची बंदरात हजारो शिपिंग कंटेनर ताब्यात घेण्यात आले. या शिपिंग कंटेनरमध्ये असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे खराब होऊ शकतात आणि अनेक आवश्यक औषधे देखील आहेत. सध्या पाकिस्तानात गव्हाच्या टंचाईची भीषण परिस्थिती आहे. खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील अनेक भागांतून गव्हाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गहू आणि पिठाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कराचीमध्ये पीठ 140 रुपये किलोवरून 160 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये 10 किलोची पिठाची पिशवी 1,500 रुपयांना विकली जात आहे, तर 20 किलोची पिशवी 2,800 रुपयांना विकली जात आहे. पंजाब प्रांतातील गिरणी मालकांनी पिठाच्या किमतीत 160 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ केली आहे. तसेच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पिठाच्या संकटाची भीषण परिस्थिती आहे. 20 किलो पिठाची पिशवी येथे 3,100 रुपयांना विकली जात आहे. सरकार दर नियंत्रणात अपयशी ठरल्यानेच हा प्रकार घडत आहे.

हेही वाचा – गव्हाच्या पिठावरून पाकिस्तान गृहयुद्धाच्या तोंडावर!

स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) ने 2 जानेवारीपासून लागू झालेले आयात निर्बंध हटवले आहेत. एसबीपीचे प्रवक्ते आबिद कमर म्हणाले, “गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेले आदेश पाहता, एसबीपीने बँकांना आयात सुलभ करण्यासाठी अधिकार दिले आहेत. त्यामुळे बँकांना अन्नपदार्थ किंवा औषधांच्या आयातीसाठी एलसी उघडण्यास प्रतिबंधित करू नये.” बँका त्यांचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. एलसी उघडल्यावर.” SBP नुसार, बँकांनी अन्न (गहू, खाद्यतेल इ.) आणि फार्मास्युटिकल्स (कच्चा माल, जीवन रक्षक/आवश्यक औषधे) इत्यादीसारख्या अत्यावश्यक आयातीच्या श्रेणीत येणाऱ्या आयातीला प्राधान्य दिले पाहिजे.

कराची होलसेल ग्रॉसरी असोसिएशनचे अध्यक्ष रउफ इब्राहिम म्हणाले की, डाळींच्या सहा हजार पेक्षा जास्त कंटेनर बंदरावर अडकल्या आहेत. या आयातीचे पैसे देण्याकरता बँकांना अडचणीचे ठरत आहे. आयातदारांनी या फसलेल्या कंटेनरसाठी शिपिंग कंपन्यांना ४८ मिलिअन अमेरिकन डॉलर दिले आहेत. जर हे कंटेनर बंदरांवरून सोडले नाही तर रमजान महिन्यांत डाळींच्या कमतरता निर्माण होऊ शकेल.

 

First Published on: January 13, 2023 3:07 PM
Exit mobile version