CoronaVirus: जगात झपाट्याने होतोय संसर्ग; १०० तासांत दहा लाख रूग्णवाढ

CoronaVirus: जगात झपाट्याने होतोय संसर्ग; १०० तासांत दहा लाख रूग्णवाढ

कोरोना

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसागणिक झपाट्याने वाढ आहे. (reuters tally) रॉयटर्स टॅली यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी जगभरातील (covid 19) कोरोनाबाधितांची संख्या १४ कोटीहून अधिक झाल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नव्हे तर १०० तासांत कोरोनाबाधितांचा विक्रमी आकडा म्हणजेच १० दहा रूग्ण वाढ झाल्याचीही माहिती मिळत आहे. कोरोनाचा पहिला रूग्ण (china) चीनमध्ये जानेवारी २०२० ला आढळून आला होता. त्यांना सलग तीन महिने कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख इतका झाला होता. मात्र कोरोना रूग्णांची संख्या १३ कोटीहून १४ कोटीपर्यंत पोहोचण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी गेला. १३ जुलै रोजी (world) जगात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ कोटी होती. तर १७ तारखेला ही १४ कोटीहून अधिक झाल्याचे समोर येत आहे.

या चार देशांमध्ये सर्वाधिक रूग्ण 

अमेरिकेत ३६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय दिवसागणिक येथे कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. गुरूवारी (america) अमेरिकेत विक्रमी वाढ होऊन ७७ हजार कोरोनाबाधित आढळून आले. तर स्वीडनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ७७ हजार २८१ रूग्ण आढळून आले आहेत. (world health organisation) जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिलेल्या माहितीनूसार शुक्रवारी कोरोनाचे २ लाख ३७ हजार ७४३ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर १२ जुलै रोजी २ लाख ३ हजार ३७० इतके रूग्ण वाढले होते. त्यामुळे जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे. सर्वाधिक रूग्णवाढ ही अमेरिका, ब्राझिल, (indida) भारत आणि दक्षिण आफ्रिकेत होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. (july) जुलै महिन्यात आतापर्यंत ५ हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर संपूर्ण जगात गेल्या ७ महिन्यांमध्ये ५ लाख ९० हजार रूग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

 हेही वाचा –

पंकजा मुंडे, तावडेंचं पुनर्वसन होणार? राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णीची शक्यता!

First Published on: July 18, 2020 3:46 PM
Exit mobile version