बाबो! राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीसाठी ९ कोटींचं टॉयलेट

बाबो!  राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीसाठी ९ कोटींचं टॉयलेट

बाबो! राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीसाठी ९ कोटींचं टॉयलेट

अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती जो बायडेन यांची पत्नी जिल बाइडेन हिच्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालय व्हाइट हाऊसमध्ये १.२ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ९ कोटी रूपयांचे टॉयलेट बनवले आहे. व्हाइट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये हे टॉयलेट बनवले आहे. जो बायडेन यांच्या पत्नीच्या टॉयलेटसाठी फक्त एवढे पैसे खर्च करण्यात आले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोलान्ड ट्रंम्प यांनी कमावलेल्या पैशाची बर्बादी होत आहे, असे ट्रंम्प समर्थक म्हणत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसमधील शौचालय दुरूस्त करण्याचे काम फ्रर्स्ट लेडी कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे. ही शौचालये तयार करण्यासाठी किती पैसै खर्च झाले आहेत याबद्दल काही आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. मे महिन्यापर्यंत याचे काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. याआधी व्हाइट हाऊसची साफ सफाई करण्यासाठी १ लाख २७ हजारांच्या खर्च करण्यात आला होता.

जिल बायडेन करतात काय ?

अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडेन यांच्या ६९ वर्षांच्या पत्नी जिल बायडेन या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयात चार डिग्री संपन्न केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये आलेल्या जिल बायडेन या पहिल्या महिला आहेत ज्या व्हाइट हाऊसमध्ये राहून स्वत:च्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेर पडून काम करणार आहेत. अमेरिकेच्या २३१ वर्षांच्या इतिहासात जिल बायडेन या पहिल्या महिला आहेत ज्या व्हाइट हाऊसच्या बाहेर काम करून पगार घेणार आहेत. जिल बायडेन या नॉर्दन वर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षिका आहेत. या आधी जो बायडेन उपराष्ट्रपती असताना जिल बायडेन एका सामुदायिक कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या. जिल बायडेन यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षिका म्हणून घालवले आहे. जिल बायडेन यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे.


हेही वाचा – ट्रम्प यांची टिवटिव बंद होताच मोदींचा वाढला भाव

 

First Published on: January 11, 2021 3:43 PM
Exit mobile version