उत्पल पर्रीकर यांच्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांची भाजपला सोडचिठ्ठी

उत्पल पर्रीकर यांच्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांची भाजपला सोडचिठ्ठी

laxmikant parsekar

नवी दिल्लीः गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत भाजपला दोन मोठे झटके बसलेत. पहिल्यांदा उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केलीय. त्यानुसार ते गोव्याच्या निवडणुकीतही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

दिलेल्या निवेदनात लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे की, मी अनेक वर्षांपासून भाजपचा सदस्य आहे. पण माझ्याकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. आता मी या पक्षात राहू शकत नाही. या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून लढणार आहे. मी काही दिवसांत औपचारिक घोषणाही करेन.

आता भाजपमध्ये कोणीही आपले मत उघडपणे मांडू शकत नाही. आता काही बाहेरच्यांनी पक्षाचा ताबा घेतल्याचा आग्रह धरला जात आहे. जुने दिवस आठवत पार्सेकर सांगतात की, मनोहर पर्रीकरांच्या काळात कोणताही निर्णय विचारमंथन करून घेतला जायचा, सर्वांचे मत विचारात घेतले जायचे, मात्र आता भाजपमध्ये ती परंपरा संपुष्टात आलीय, असंही लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणालेत.

काही लोक पार्सेकर यांच्याकडे आव्हानात्मक म्हणून पाहत असल्याचेही बोलले जात आहे. त्यांना तिकीट मिळणार नाही, असा आभास पक्षांतर्गत त्यांच्याबद्दल निर्माण केला जात होता. मात्र पार्सेकर स्वतःच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नसल्याचे सांगतात. त्यांच्या जागी भाजपने गेल्या पाच वर्षांत एकही काम न केलेल्या काँग्रेसच्या व्यक्तीला तिकीट दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते त्यांच्या भागातील अनेक प्रकल्पही अपूर्ण राहतात. ते पूर्ण करू शकतील, अशी लोकांची आशा आहे. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही.


हेही वाचाः मेडिकलवाल्यांना नोटा मोजायला वेळ कसा मिळतो?, अजितदादांनी कोरोना टेस्ट कीटवरुन फटकारलं

First Published on: January 22, 2022 6:25 PM
Exit mobile version