माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रणव फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्मीच्या रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलने सोमवारी मेडिकल बुलेटिनदरम्यान सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रणव मुखर्जी हे अजूनही दीर्घ कोमात असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, कालपासून मुखर्जी यांची प्रकृती खालावत आहे. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने ते सध्या सेप्टिक शॉकमध्ये आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मुखर्जी अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी यांना राजाजी मार्ग येथील घरी घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. तसेच मुखर्जी यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी सर्वांनी दिलेल्या सदिच्छा आणि प्रार्थनेसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती.

हेही वाचा –

Supreme Court : अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

First Published on: August 31, 2020 1:12 PM
Exit mobile version