शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून मिखाईल गोर्बाचेव्ह हे आजारी होते. तसेच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गोर्बाचेव्ह हे 1985 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले होते. तसेच 1991 पर्यंत ते या पक्षाचे सरचिटणीस होते. त्यानंतर सोविएत संघाचे पतन झाले. त्यांनी ग्लासनोस्टचे धोरण म्हणजेच सरकारला सल्ला आणि माहितीच्या विस्तृत प्रसाराचं धोरण स्वीकारलं होतं.

मिखाईल गोर्बाचेव्ह हे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकचे अर्थात यूएसएसआरचे शेवटचे नेते होते. त्यांना नेहमी लोकशाही तत्त्वांच्या आधारावर नागरिकांना स्वातंत्र्य देऊन कम्युनिस्ट राजवटीत सुधारणा करायची होती. सरकारी यंत्रणेवरील पक्षाचे नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या.

सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद सोडल्यानंतर गोर्बाचेव्ह यांना जगभरातील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. 1990 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. शीतयुद्धाचा शेवट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आँटोन गट्रेस यांनी ट्विटरव्दारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतिहास बदलण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जगानं एक मोठा नेता, शांततेचा पुरस्कर्ता गमावला आहे, असं आँटोन गट्रेस म्हणाले.


हेही वाचा : वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर! सर्व परिवहन सुविधा एकाच टर्मिनलमध्ये, इंटर मॉडेल स्टेशन उभारणार


 

First Published on: August 31, 2022 11:17 AM
Exit mobile version