Coronavirus: अफ्रिकेतून परतलेले नवकोरोनाचे भारतात रुग्ण

Coronavirus: अफ्रिकेतून परतलेले नवकोरोनाचे भारतात रुग्ण

जानेवारी महिन्यात दक्षिण अफ्रिकेतील नवकोरोनाची लागण भारतातील चार लोकांना झाली होती. तर फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यात ब्राझिलमधील नवकोरोनाची लागण एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने मंगळवारी देण्यात आली. देशात गेल्या २४ तासांत ९,१२१ रुग्ण, ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात अंगोला आणि टान्झानियातून आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला तर दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

या सर्व प्रवाशांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केली असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ब्राझिलमधूनही नवकोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीच्या ही संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. व त्यांच्यावर कोरोना लशीचा काय परिणाम होतो आहे याची तपासणी सुरु आहे. याचदरम्यान ब्रिटनमधील नवकोरोनाची देशातील १८७ जणांना लागण झाली आहे. यामुळे नवकोरोनावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. देशात मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत ८७ लाख ४० हजार ५९५ जणांना लशीची मात्रा टोचण्यात आली. त्यामध्ये ६२ लाख ८२ हजार ६४६ जण आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आहेत.

देशात चौथ्यांदा १० हजाराहून कोरोनाचे कमी रुग्ण आढळून आले आहे. या महिन्यात करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दहाव्यांदा १०० हून कमी झाली आहे ,तर कोरोनाबाधीतांची संख्या एक कोटी, नऊ लाख, २५ हजार, ७१० वर पोहोचली आहे. असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.


हे ही वाचा- #MeToo प्रकरण; दिल्ली कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांचा मानहानीचा दावा फेटाळला

First Published on: February 17, 2021 4:37 PM
Exit mobile version