Friendship day 2021: फ्रेंडशिप डे कधी आहे?,जाणून घ्या फ्रेंडशिप डे ची तारीख,इतिहास आणि माहिती

Friendship day 2021: फ्रेंडशिप डे कधी आहे?,जाणून घ्या फ्रेंडशिप डे ची तारीख,इतिहास आणि माहिती

Friendship day 2021: फ्रेंडशिप डे कधी आहे?,जाणून घ्या फ्रेंडशिप डे ची तारीख,इतिहास आणि माहिती

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस 1 ऑगस्ट रोजी आला आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅप, फेसबुक, एसएमएस, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छांचा देताना दिसत आहेत. मैत्री हे एक असं नातं आहे की याची निवड आपण स्वत: करतो. बाकी सर्व नाती बालपणापासून आपल्या सोबत जोडली जातात. आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मैत्री.आपल्या आयुष्यातला खास सदस्य म्हणजे मित्र. जो आपल्या प्रत्येक, दुःख, अडचणी अशा प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत उभा असतो. परिस्थिती काहीही असो तो आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. पण सर्वप्रथम या दिवसाची सुरूवात कशी झाली? पहील्यांदा फ्रेंडशिप डे कधी साजरा केला गेला? याची संपुर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

1958 साली पाहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. 1958 मध्ये अमेरिकेमधील सरकारने एका व्यक्तीची हत्या केली होती. आणि हा दिवस होता ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. मृत पावलेल्या माणसाचा एक जिवाभावाचा मित्र होता. दोघांची मैत्री खुप घट्ट होती. आपल्या मित्राची हत्या झाली आहे हे कळताच त्याने सुद्ध आत्महत्या केली. यानंतर अमेरिकेच्या सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केलं आहे.तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 जुलै या दिवशी अधिकृतरित्या मैत्री दिवस साजरा केला जातो. आणि भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो.


हे हि वाचा – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती गंभीर; दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

First Published on: July 29, 2021 1:59 PM
Exit mobile version