लग्नाचा आहेर ‘पेट्रोल’, चक्रावले पाहुणे

लग्नाचा आहेर ‘पेट्रोल’, चक्रावले पाहुणे

लग्नाचा आहेर म्हणून दिला ५ लिटर पेट्रोलचा कॅन (फोटो सौ.- सोशल मीडिया)

पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे एकीकडे सामान्य जनता हैराण झालेलीअसताना, दुसरीकडे तामिळनाडूमध्ये एक एक भन्नाट प्रकार पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये एका लग्न सोहळ्यादरम्यान जोडप्याला गिफ्ट म्हणून चक्क ‘पेट्रोल’चा कॅन दिला गेला. नवरदेवाला त्याच्या मित्रांनी लग्नाचा आहेर म्हणून ५ लिटर पेट्रोलचा कॅन दिला. हे आगळं वेगळं आणि काहीसं विचित्र गिफ्ट पाहून सोहळ्यात उपस्थित लोक चांगलेच चक्रावून गेले. सध्याचे पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले दर पाहता, गिफ्ट म्हणून पेट्रोल देण्याचा हा प्रकार सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारा होता. नवरदेवाच्या मित्रांनी दिलेलं हे गिफ्ट खऱ्या अर्थाने ‘महागडं’ म्हणावं लागेल. दरम्यान या मजेशीर प्रसंगाचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


वाचा : पेट्रोल-डिझेलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर रामदास आठवलेंचा माफीनामा

तामिळनाडूतील इंधनाचे दर

सध्या तामिळनाडूमध्ये पेट्रोलचा दर ८५.१५ रुपये प्रतिलिटर एतका आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा देशामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये सोमवारचा (आजचा) पेट्रोलचा दर एक लिटरमागे १५ पैशांनी वाढला आहे. तर डिझेलच्या दरात ७ पैशांनी वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या इंधन दरवाढीमुळे लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या दरवढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर देखील होताना दिसतो आहे. इंधन दरनाढीमुळे बऱ्याचशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील वधारले आहेत.


वाचा : पेट्रोल-डिझेलचा ‘भाव’ वाढत चालला

First Published on: September 17, 2018 2:17 PM
Exit mobile version