घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलचा 'भाव' वाढत चालला

पेट्रोल-डिझेलचा ‘भाव’ वाढत चालला

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे जनतेच्या खिशाला फटका बसत चालला आहे. सलग २३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पुढच्या काही दिवसात ही वाढ अशीच होत राहिली तर पेट्रोल शंभरी गाठेल.

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचे सत्र सुरुच आहे. सलग २३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरुच आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेली जनता आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे आणखी सतंप्त झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर असेल वाढत राहिले तर पुढच्या काही दिवसात शंभरी गाठेल. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये १५ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये ७ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर नव्वदी गाठायला आले आहेत. आज पेट्रोलचा दर ८९.४४ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७८.३३ रुपये प्रतीलिटर दराने मिळत आहे.

- Advertisement -

राजधानीतही पेट्रोल-डिझेलच्या दर वाढले

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला तर दिल्लीमध्ये ८१ चा आकडा गाठला आहे. तर डिझेलने देखील मुंबईत ८० चा आकडा गाठला तर दिल्लीमध्ये ७५ चा आकडा गाठला आहे. राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये १५ पैशांनी आणि डिझेलच्या दरामध्ये ०६ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.०६ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७३.७८ रुपये प्रतीलिटर झाला आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत.

परभणी- नांदेडमध्ये नव्वदी केली पार!

दरम्यान, राज्यभरात पेट्रोलचे दर वाढत असताना परभणी आणि नांदेडमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. नांदेडमध्ये पेट्रोल ९२.१९ रुपयांना मिळत आहे. तर डिझेल ८२.८९ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोल ९१.२२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. रुपयाचं सातत्यानं होणारं अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती ही दोन प्रमुख कारणं पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी दिली जात आहेत. तर दुसरीकडे या दरवाढीला भाजप सरकारला जबाबदार धरत काँग्रेससह सर्व विरोधकांनी रान उठवायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -