दिलासा! ऑगस्टपासून पेट्रोल होणार स्वस्त; जाणून घ्या OPEC देशांची योजना

दिलासा! ऑगस्टपासून पेट्रोल होणार स्वस्त; जाणून घ्या OPEC देशांची योजना

देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे इंधनदरवाढीने सर्वसामान्यांचे जीवन जगणं कठीण झाले आहे. मात्र आता सर्वसामान्यांना काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता लवकरच महागड्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकरच घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी OPEC समूहाबरोबर झालेल्या बैठकीनंतर पेट्रोल लवकरच स्वस्त होईल, अशी आशा आहे. या बैठकीत संपूर्ण करार झाला असून ज्या अंतर्गत ५ ओपेक आणि नॉन-ओपेक देश ऑगस्टपासून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणार आहेत. मात्र यापूर्वी या देशांमधील झालेल्या वादाचा परिणाम तेलाच्या किंमतींवर झाल्याने तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती.

तेल उत्पादक आणि निर्यात करणार्‍या देशांच्या संघटना OPEC आणि त्याच्या भागीदार उत्पादक देशांच्या ऑनलाइन बैठकीनंतर रविवारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात असे सांगितले की इराक, कुवैत, रशिया, सौदी अरेबिया आणि युएईच्या तेल उत्पादनाची मर्यादा वाढवण्यात येईल.

दरमहा ४ लाख उत्पादन बॅरल वाढविण्यात येणार

दरम्यान, ऑगस्टपासून त्याचे उत्पादन दरमहा ४ लाख बॅरल वाढविण्यात येणार आहे. अशाप्रकारे दररोजचे उत्पादन ५८ लाख बॅरेल्स कपात होऊन हळूहळू हे २०२२ अखेर संपणार असल्याचे ओपेक देशांनी म्हटले आहे. या निर्णयानंतर, २ मिलियन बीपीडी उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. या ऑनलाइन बैठकीनंतर यूएईचे ऊर्जामंत्री सुहेल-अल-मजरूई यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी तातडीने माहिती दिली नसली तरी सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलाझीझ बिन सलमान यांनी उत्पादन मर्यादेबाबत गटांमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. नंतर यासंदर्भातील ओपेकच्या निवेदनात, ५ देशांची उत्पादन पातळी वाढविण्याच्या कराराबाबत माहिती देण्यात आली.

या नव्याने ठरविलेल्या धोरणांतर्गत मे २०२२ पासून युएई दररोज ३५ लाख बॅरल्स तयार करू शकणार आहे. या अहवालानुसार युएई आधी स्वतःसाठी ३८ लाख बॅरल / दिवसाचे उत्पादन घेण्याची मर्यादा मागणी करत होता. त्याचप्रमाणे सौदी अरेबियाची दैनंदिन उत्पादन मर्यादा १.१० कोटी बॅरेलवरून १.१५ कोटी बॅरलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. रशियाची उत्पादन मर्यादा देखील समान राहणार असून इराक आणि कुवैत यांच्या दैनंदिन उत्पादन मर्यादेतील वाढ या तुलनेत थोडीशी कमी असल्याचे सांगितले जात आहे.


डायबिटीज रुग्णांसाठी कोरोना ठरतोय कर्दनकाळ, अमेरिकेत अडीच लाख रुग्णांच्या मृत्यूचे ठरला…

First Published on: July 19, 2021 1:20 PM
Exit mobile version