Gandhi Jayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटवर; गांधीजींना वाहिली आदरांजली

Gandhi Jayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटवर; गांधीजींना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज, २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त रोजी सकाळी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. देशाते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. २ ऑक्टोबर १८६९ साली मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजराममधील पोरबंदर येथे झाला होता. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांशी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे होते. त्यांच्या जयंती निमित्त विविध स्तरातून त्यांना आदरांजली अर्पित केली जात आहे.

गांधी जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही महात्मा गांधी यांचा एक दुर्मिळ फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच गृहममंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांसह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा –

मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

First Published on: October 2, 2020 7:54 AM
Exit mobile version