वासनांध! चौदा वर्षाच्या मुलीवर २ वेळा सामुहिक बलात्कार; ५ नराधम अटकेत

वासनांध! चौदा वर्षाच्या मुलीवर २ वेळा सामुहिक बलात्कार; ५ नराधम अटकेत

फोटो सौजन्य - The Hans India

वासनांधतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मध्यप्रदेशमध्ये १४ वर्षीय मुलीवर ५ नराधमांनी २ वेळा सामुहिक बलात्कार केल्याची घटना मध्यप्रदेशातील चिंडवाडामध्ये घडली आहे. या घटनेने मध्यप्रदेश हादरून गेले आहे. सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी ५ नराधमांना अटक केली आहे. बलात्काराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ६ जुलैच्या संध्याकाळी घरातून गेलेली पीडित परत न आल्याने घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलीचा शोध घेतला असता ८ जुलै रोजी पीडित टोला भागामध्ये सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने आता नराधमांना कठोर शिक्षा करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कशी घडली घटना?

६ जुलै रोजी संध्याकाळी पीडित घरातून बाहेर पडली. हीच संधी साधत मोहित भारद्वाज या २२ वर्षीय तरूणाने तिला दुचाकीवर बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर मोहित त्याचा २४ वर्षीय मित्र राहुल भोंडेच्या घरी पीडितेला घेऊन गेला. दोघा वासनांधांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पीडित घरी परतत असताना बंटी भालावी, अनिकेत रघुवंशी आणि अमित विश्वकर्मा यांनी तिला पुन्हा एकदा राहुल भोंडेंच्या घरी नेत बलात्कार केला. पीडित घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी घरच्यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता पीडित मुलगी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये टोला भागात सापडली. त्यांनंतर तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ नराधमांना अटक केली. पोलिसांनी पाचही नराधमांवर सामुहिक बलात्कार, अपहरण आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खरंच महिला सुरक्षित?

दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेता प्रश्न आता ऐरणीवर येत आहे. इंग्लंडच्या एका संस्थेने भारतातील महिलांची स्थिती ही सौदी अरेबियातील महिलांपेक्षा देखील वाईट असल्याचा अहवाल दिला होता. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आता देशातील महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहे.

First Published on: July 10, 2018 8:41 PM
Exit mobile version