Gangster Mukhtar Ansari : आजोबा स्वातंत्र्य सैनिक, काका उपराष्ट्रपती; अशी आहे गँगस्टर मुख्तार अंसारीच्या कुटुंबाची हिस्ट्री

Gangster Mukhtar Ansari : आजोबा स्वातंत्र्य सैनिक, काका उपराष्ट्रपती; अशी आहे गँगस्टर मुख्तार अंसारीच्या कुटुंबाची हिस्ट्री

कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारी याचे गुरुवारी संध्याकाळी ह्रदयविकाराच्या झटका येऊन निधन

नवी दिल्ली – बांदा मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारी याचे गुरुवारी संध्याकाळी ह्रदयविकाराच्या झटका येऊन निधन झाले. तुरुंगातच त्याची तब्यत बिघडली, त्यानंतर त्याला दुर्गावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. माफिया डॉन मुख्तार अंसारीच्या कुटुंबातील सदस्यांची नावे पाहिली तर कोणालाही विश्वास बसत नाही की मुख्तार अंसारी या कुटुंबाचा सदस्य होता.

कोण होता मुख्तार अंसारी

मुख्तार अंसारीचा जन्म गाजीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबादमध्ये 3 जून 1963 रोजी झाला होता. त्याच्या पित्याचे नाव सुबहानउल्लाह अंसारी आणि आईचे नाव बेगम राबिया होते. गुजीपूरमध्ये मुख्तार अंसारीच्या कुटुंबाची ओळख म्हणजे एक प्रतिष्ठीत राजकीय घराणे.
17 वर्षांहून अधिक काळापासून तुरुंगात असलेल्या मुख्तार अंसारीचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अंसारी स्वातंत्र्य सैनिक होते. महात्मा गांधीजींसोबत त्यांनी काम केले. 1926-27 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. मुख्तार अंसारीच्या आईचे वडील ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान 1947 च्या युद्धात शहीद झाले होते. त्यांना महवीर चक्रने सन्मानित करण्यात आले होते. मुख्तार अंसारीचे पिता सुबहानउल्लाह अंसारी हे गाजीपूरमधील एक स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी म्हणून ओळखले जात. देशाचे उपराष्ट्रपती हामिद अंसारी हे नात्याने मुख्तार अंसारी यांचे काका लागतात.

पूर्वांचलमधला दबंग नेता

मुख्तार अंसारी हा स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील होता. एक आजोबा स्वातंत्र्य सैनिक तर दुसरे ब्रिगेडियर आणि महावीर चक्र प्राप्त. अशा कुटुंबातील मुख्तार अंसारी पूर्वांचलमधला दबंग नेता, माफिया, गँगस्टर म्हणून ओळखला गेला. पिळदार मिशा असलेल्या या आमदाराचा आज मृत्यू झाला असला तरी मऊ आणि पंचक्रोशीत मुख्तार अंसारीचा दबदबा होता. एक काळ होता जेव्हा संपूर्ण परिसर मुख्तारच्या नावाने कापत होता. मुख्तार अंसारीने भाजप वगळता उत्तर प्रदेशमधील बहुतेक सर्वच पक्षांमध्ये कधीना कधी प्रवेश केला होता. मुख्तार अंसारी सलग 24 वर्षे उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होता.

हेही वाचा : CS Karir : मुख्य सचिव नितीन करीर यांना तीन महिने मुदतवाढ; यामुळे सौनिक, राजेशकुमार, चहल यांचा पत्ता कट?

First Published on: March 28, 2024 11:28 PM
Exit mobile version