कुख्यात गुंड रवी पुजारी सेनेगलमधून पसार

कुख्यात गुंड रवी पुजारी सेनेगलमधून पसार

याच वर्षी सेनेगल पोलिसांनी अटक केलेल्या कुख्यात गुंड छोटा राजन याचा विश्वासू साथीदार गँगस्टर रवी पुजारी या हा आफ्रिकेतील सेनेगल देशातून पसार झाला आहे. सेनेगल पोलिसांनी अटक केल्यानंतर तो जामिनावर सुटका होता. रवी पुजारी विरोधात भारतात खंडणीचे तब्बल २०० गुन्हे दाखल आहेत. पैकी २६ गुन्हे गुजरातमध्ये दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवी पुजारी सेनेगलमध्ये अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता. बुर्किना फासो या देशाचा नागरिक असल्याचे त्याने सांगितले होते. रवी पुजारीचे गुजरातमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांनी तो सेनेगलमधून फरार झाल्याची माहिती दिली आहे. आफ्रिकेतील दुसऱ्या एखाद्या देशात तो पळाला असणार असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भारताची सेनेगलकडे पुजारीच्या प्रत्यार्पणाची मागणी

दरम्यान भारताने सेनेगलकडे पुजारीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्याचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी परराष्ट्र व गृहमंत्रालयाचे अधिकारी सेनेगल सरकारच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण पुजारीचा ठावठिकाणा लागताच त्याला पहिल्यांदा सेनेगलमध्येच शिक्षा भोगावी लागेल. त्यानंतरच त्याला भारताच्या हवाली करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे सूत्रांनी सांगितले.

बिल्डर, व्यावसायिक, सोने व्यापारी यांच्याकडे खंडणीची मागणी

गँगस्टर रवी पुजारी याच्यावर गुजरातमध्ये २०० गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी गोळा करणे, गोळीबार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. गुजरातमधील बांधकाम व्यावसायिक, सोने व्यापारी, राजकीय नेते यांसारख्या तब्बल ७० लोकांना फोन करुन त्याने खंडणी उकळली असल्याची माहिती गुजरातच्या गुन्हे शाखेनं दिली आहे. खंडणीच्या प्रकरणांबरोबरच त्याच्यावर आनंद जिल्ह्यातील प्रग्नेश पटेल याच्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे पुजारीने या सर्व गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

First Published on: October 18, 2019 11:06 AM
Exit mobile version